AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, बडा नेता करणार शिवसेना शिंदे गटात प्रवेश? मिळणार थेट मोठं पद

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना शिंदे गटात इनकमिंग सुरूच आहे. आता आणखी एक बडा नेता शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता असून, या नेत्याला मोठं पद मिळण्याची शक्यता आहे.

राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, बडा नेता करणार शिवसेना शिंदे गटात प्रवेश? मिळणार थेट मोठं पद
eknath shinde Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 14, 2026 | 7:35 PM
Share

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं होतं. तर महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला गळती लागल्याचं पहायला मिळालं. महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. दरम्यान  अजूनही शिवसेना शिंदे गटात इनकमिंग सुरूच आहे. शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र आता राष्ट्रवादी अजित पवार गटातून मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते आणि नेते आनंद परांजपे हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.  त्यांनी काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याची भेट घेतली होती.

आनंद परांजपे यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील आपल्या सर्व पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर ते नॉटरिचेबल झाले आहेत. मी पक्षाती माझ्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत, असं त्यांनी राजीनामा देताना म्हटलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आनंद परांजपे हे विधान परिषदेसाठी इच्छुक होते. मात्र यावेळी झिशान सिद्दिकी यांना राष्ट्रवादीच्या वतीनं विधान परिषदेवर पाठवण्यात आले, त्यामुळे परांजपे हे नाराज होते, अखेर त्यांनी आज राष्ट्रवादीचा राजीनामा दिला आहे.

दरम्यान आनंद परांजपे हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत, अशी देखील आता चर्चा सुरू आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. राजकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार  आनंद परांजपे यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेत हालचाली वाढल्या आहेत.  आनंद परांजपे यांनी जर शिवसेनेत पक्ष प्रवेश केला तर त्यांना एका महामंडळांचं अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेना पक्षात मोठी संघटनात्मक जबादारी देखील मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता आनंद परांजपे हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार का?  की आणखी दुसऱ्या एखाद्या पक्षात जाणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. परांजपे यांचा राजीनामा हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुर...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ
माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
Shivraj More : माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी...
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी संकटात
80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; शिवराज मोरे....
Shivraj More : 80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; MPSC कार्यकर्ता शिवराज मोरे यांचा खळबळजनक दावा
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन यांचा आरोपांनी खळबळ
याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे
Shivraj More : MPSC Students Protest : याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे यांचा पलटवार, नेमकं प्रकरण काय?
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार...
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार म्हणाले...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत... विद्यार्थिनींच्या संतापानंतर परिक्षाच रद्द
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर आरोप