AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! आधी राजीनामा दिला, आता नॉट रिचेबल… राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या निर्णयाने राष्ट्रवादीत खळबळ

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. बड्या नेत्यानं तडका फडकी राजीनामा दिला आहे. राजीनाम्यानंतर नेता नॉट रिचेबल झाला आहे.

मोठी बातमी ! आधी राजीनामा दिला, आता नॉट रिचेबल... राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या निर्णयाने राष्ट्रवादीत खळबळ
आनंद परांजपे
| Updated on: May 14, 2026 | 6:55 PM
Share

नुकत्याच विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटातून विधान परिषदेसाठी अनेकजण उत्सुक होते. महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला एक विधान परिषदेची जागा आली होती. यावेळी पक्षाच्या वतीने विधान परिषदेसाठी झिशान सिद्दिकी यांना संधी देण्यात आली . मात्र त्यानंतर आता विधान परिषदेवर संधी न मिळाल्याने राष्ट्रवादीमधील काही नेते नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. याचदरम्यान राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. पक्षातील बडा नेता आपल्या सर्व पदांचा राजीनामा देऊन नॉट रिचेबल झाल्याची माहिती समोर येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी गुरुवारी पक्षातील आपल्या सर्व पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर ते नॉट रिचेबल झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. मला पक्षाने दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या मी पार पाडल्या आहेत, असं राजीनामा दिल्यानंतर आनंद परांजपे यांनी म्हटलं होतं.  विधान परिषद न मिळाल्याने आनंद परांजपे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.

राष्ट्रवादी पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.  विधान परिषदेसाठी अनेक लोकांची नावं समोर होती,  मात्र  परांजपे यांना संधी न मिळाल्याने ते नाराज होते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान आनंद परांजपे हे आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश करू शकतात अशी देखील चर्चा सुरू आहे, परंतु ते नक्की कोणत्या पक्षात प्रवेश करणार? हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये.

नजीब मुल्ला यांची प्रतिक्रिया 

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी आता आनंद परांजपे यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे.  सकाळी बोलताना ते व्यवस्थित वाटले. परंतु आता त्यांचा आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकाचा फोन बंद आहे. हे खरं आहे की, ते 2012 मध्ये विद्यमान खासदार होते. पवार साहेबांनी त्यांना शब्द दिला होता राज्यसभा देऊ, पण 12 वर्ष त्यांच्यावर अन्याय झाला, त्यामुळे ते नाराज होते. महामंडळाचे उपाध्यक्षपद त्यांना द्यायचे ठरले होते.  पुनर्वसन व्हावं अशी त्यांची इच्छा होती,  त्यांना मी सांगितलं होतं दोन महिने शांत राहा. आमची राम रहीमची जोडी आहे. माझा संपर्क झाला की मी त्यांच्याशी बोलेन, मी सर्वांना सांगणार आहे, त्यांचा राजीनामा स्वीकारू नये, असं नजीब मुल्ला यांनी म्हटलं आहे.

Follow Us
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी...
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी संकटात
80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; शिवराज मोरे....
Shivraj More : 80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; MPSC कार्यकर्ता शिवराज मोरे यांचा खळबळजनक दावा
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन यांचा आरोपांनी खळबळ
याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे
Shivraj More : MPSC Students Protest : याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे यांचा पलटवार, नेमकं प्रकरण काय?
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार...
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार म्हणाले...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत... विद्यार्थिनींच्या संतापानंतर परिक्षाच रद्द
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर आरोप
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील...
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील प्रवासावर मोदींचं मनोगत
25 वर्षांचा राजकीय प्रवास; मोदींच्या कार्याचा विशेष गौरव
25 वर्षे जनसेवेची! PM मोदींच्या सत्तेतील प्रवासाचे नीतिन नबीन यांच्याकडून कौतुक