विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धुळे जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार

विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) तोंडावर धुळ्यात राजकीय घडामोडींना (Dhule Politics) वेग आला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धुळे जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार

धुळे: विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) तोंडावर धुळ्यात राजकीय (Dhule Politics) घडामोडींना वेग आला आहे. शिरपूर येथील काँग्रेसचे विधान परिषदेचे विद्यमान आमदार अमरीश पटेल यांनी राजीनामा (Congress MLA Amrish Patel Resign) दिला आहे. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार (Amrish Patel Join BJP) असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अमरिश पटेल काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. मात्र, त्यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला काँग्रेसला रामराम ठोकल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या भाजपच्या मेगा भरतीच्या वेळीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अमरीश पटेल (Chandrakant Patil on Amrish Patel) यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत दिले होते. मात्र, आता अमरीश पटेल यांच्या राजीनाम्यानंतर यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

अमरीश पटेल यांच्यासोबत साक्री येथील विधानसभेचे विद्यमान आमदार धनाजी अहिरे  (डी. एस. अहिरे) हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. धनाजी अहिरे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लढताना भाजपच्या मंजुळा गावित यांचा पराभव केला होता. त्यांनी 3323 मतांनी विजय मिळवला होता. धनाजी अहिरे यांना 74760 आणि मंजुळा गावित यांना 71437 मतं मिळाली होती. मात्र, आता तेच भाजपच्या मार्गावर असल्याने काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली आहे.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धुळे जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार पडल्याचं दिसत आहे. आता सत्ताधारी भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांसमोर काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार कोण असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI