AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर, बिहारमध्ये 19 पैकी 11 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

बिहारमधले काँग्रेसचे 9 पैकी 11 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय.

काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर, बिहारमध्ये 19 पैकी 11 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत
| Updated on: Jan 06, 2021 | 4:43 PM
Share

पाटणा :  नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला. त्या पराभवातून काँग्रेस आणखी सावरलेली नाहीय. आत्मचिंतनाच्या बैठका अजूनही सुरु आहे. अशातच बिहारमध्ये काँग्रेसला आता मोठा धक्का बसणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. कारण कारण बिहारमधले काँग्रेसचे 9 पैकी 11 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय. (Bihar Congress 11 out Of 19 MLAs preparing to Leave Party)

बिहार विधानसभा निवडणुकीत झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेसने अ‌ॅक्टीव्ह होत संघटनात्मक बदल केले. काँग्रेस आता सावरतीय, अशी परिस्थिती निर्माण झाली असतानाच काँग्रेसचे 11 आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चा आहेत. तशी माहितीच काँग्रेसच्या माजी आमदारांनी दिली आहे. त्यामुळे बिहारमध्ये काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर आहे, असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही.

काँग्रेस पक्षाचे काही आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे माजी आमदार भरत सिंह यांनी केला आहे. त्यानंतर बिहारच्या राजकारणामध्ये भूकंप झाला आहे. 19 पैकी 11 आमदार काँग्रेसचा हात सोडणार असल्याची शक्यता माजी आमदार भरत सिंह यांनी वर्तवली आहे.

काँग्रेसचे राज्यसभा खासदार शक्तिसिंह गोहिल यांच्याकडे बिहारचं काँग्रेस प्रभारीपद होतं. परंतु विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर आपल्याला या जबाबदारीतून मुक्त करावं, अशी विनंती त्यांनी काँग्रेस हायकमांडला केली होती. त्यांची विनंती मान्य करत पक्षनेतृत्वाने त्यांना बिहार प्रभारी पदावरुन मुक्त केलं. गोहिल यांच्या जागी माजी केंद्रीय मंत्री भक्त चरण दास यांना बिहारच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या खांदेपालटानंतर काँग्रेसचे आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचं पक्षातील काही नेत्यांचं म्हणणं आहे.

‘फुटणाऱ्या आमदारांनी पैसे देऊन तिकीट विकत घेतले होते’

“काँग्रेसच्या 19 आमदारांपैकी 11 आमदार असे आहेत ज्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक जिंकली असली तरी ते काँग्रेसचे नाहीत. या लोकांनी पैसे देऊन तिकीट घेतलं आणि आमदार झाले”, असा गौप्यस्फोट भरत सिंह यांनी केला आहे.

काँग्रेस आमदार फुटणार, NDA मध्ये सहभागी होणार?

राजद आणि भाजप (NDA) आपलं संख्याबळ वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी NDA मधील अनेक नेते काँग्रेस आमदारांच्या संपर्कात आहेत, असा दावा भरत सिंहांनी केलाय. दरम्यान त्यांचा हा दावा काँग्रेस नेते फेटाळत आहेत. काँग्रेस पक्ष एकसंध आणि एकजूट असल्याचं काँग्रेसचे राज्यसभा खासदार अखिलेश सिंह यांनी म्हटलंय.

संबंधित बातम्या:

बिहारमध्ये आम्हाला संधीचं सोनं करता आलं नाही, पण राहुल गांधींनी चांगला प्रचार केला; काँग्रेस नेत्याकडून पाठराखण

नितीश कुमारांनी हिंमत दाखवावी, बिहारमध्ये महाराष्ट्राची पुनरावृत्ती घडेल : काँग्रेस

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.