Bihar | नितीश कुमारांनी दगा दिला अन् सरकार उलथलं, बिहारच्या इतिहासातले 4 प्रसंग, भाजपला धोक्याची घंटा

लालूंचा राजद, काँग्रेस आणि डाव्या आघाडीसोबत नितीश कुमार पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्नात असल्याचंही बोललं जातंय. असं घडलंच तर 2017 नंतर जदयू पुन्हा एकदा लालूंच्या राजदसोबत हातमिळवणी करेल आणि राजदसोबतच्या त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळाला सुरुवात होईल..

Bihar | नितीश कुमारांनी दगा दिला अन् सरकार उलथलं, बिहारच्या इतिहासातले 4 प्रसंग, भाजपला धोक्याची घंटा
नितीश कुमार, मुख्यमंत्री बिहारImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 6:00 AM

बिहारः बिहारच्या राजकारणात (Bihar politics) मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेत-त्वात आयोजित करण्यात आलेल्या नीती आयोगाच्या बैठकीला मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) गैरहजर राहिले. एनडीएचे मित्रपक्ष आणि नितीश कुमार नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. नितीश कुमारांची पुन्हा एकदा लालू प्रसाद यादव यांच्या राजदसोबत जवळीक वाढल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवस बिहारच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरू शकतात. नितीश कुमार भाजपाला कधीही दगा देऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जातेय. पण नितीश कुमार यांनी दगा देण्याची बिहारच्या राजकारणातली ही पहिली वेळ नाही. यापूर्वीदेखील त्यांनी चार वेळा सत्ता परिवर्तन घडवून आणलंय. पुन्हा एकदा हेच घडलं तर इतिहासाची पुनरावृत्ती झाली, असंच म्हणावं लागेल.

सध्या काय घडतंय?

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे एनडीएच्या दोन मित्रपक्षांमध्ये बेबनाव होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागील 20 दिवसांपासून अशा प्रमुख बैठकांना भाजप आणि नितीश कुमार यांच्यात तणावाची स्थिती असल्याचे दिसतेय. नितीश कुमारांचा जदयू आणि भाजपची युती तुटण्याच्या स्थितीत असल्याचे माध्यमांतून सांगण्यात येतंय. लालूंचा राजद, काँग्रेस आणि डाव्या आघाडीसोबत नितीश कुमार पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्नात असल्याचंही बोललं जातंय. असं घडलंच तर 2017 नंतर जदयू पुन्हा एकदा लालूंच्या राजदसोबत हातमिळवणी करेल आणि राजदसोबतच्या त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळाला सुरुवात होईल.. नितीश कुमारांनी धक्का देण्याची ही पाचवी वेळ असेल. आधीचे 4 प्रसंग कोणते?

1990 मध्ये जनता दलात होते तेव्हा…

नितीश कुमार 1990 मध्ये बिहारच्या राजकारणात चर्चेत आले. तत्कालीन जनता दलात त्यांनी लालू प्रसाद यादव यांना मुख्यमंत्री बनण्यात मदत केली. नितीश कुमार यांनी 1985 मध्ये हरनौत मतदार संघातून पहिल्यांदा विधानसभा जिंकली. चार वर्षानंतर 1989 मध्ये त्यांनी जनता दलाच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक जिंकली. 1991 मध्ये मध्यावधी निवडणुकीत पुन्हा निवडणूक जिंकली. 1994मध्ये जनता दलात लालू प्रसाद यादवांविरोधात बंड केलं. समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत समता पार्टी काढली. त्यानंतर जॉर्ज फर्नांडिस यांच्या नेतृत्वात समता पार्टी आणि शरद यादव यांच्या नेतृत्वातील जनता दल (युनायटेड) चे विलीनीकरण झाले.

2013 मध्ये एनडीएतून बाहेर पडले

16 जून 2013 मध्ये भाजपने नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणूक प्रचार मोहिम समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले तेव्हा नितीश कुमार नाराज झाले. त्यांनी भाजपसोबतची 17 वर्षांची युती तोडली. बिहारच्या युतीत बाहेरील व्यक्तीचा हस्तक्षेप असल्याची टीका त्यांनी त्यावेळी नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता केली होती.

राजदसोबत हातमिळवणी, महाआघाडी सरकार

2015 मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत आणखी मोठी घडामोड झाली. नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेससोबत महाआघाडी केली. जदयू आणि राजदने 101 जागांवर निवडणूक लढवली. 80 जागांवर विजय मिळवला. जदयूने 71 जागांवर ताबा घेतला. नितीश कुमार महाआघाडीचे नेते बनले आणि पाचव्या वेळा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

जदयूने महायुती सोडली..

26 जुलै 2017 मध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदावरून राजीनामा दिला. तेव्हाचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. तेजस्वी यांच्या राजीनाम्याची मागणी वाढली होती. नितीश कुमारांवरही दबाव आला. त्यांनी सरकारमधून दूर होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जदयूने भाजप आणि मित्रपक्षांसोबत सरकार स्थापन केलं.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.