मुंबईत नियम धाब्यावर बसवत प्रभाग फेररचना, भाजपचा आरोप; गांधीगिरी आंदोलनातून निषेध

मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी राजकीय दबावाखाली, पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना डावलून संवैधानिक नियम धाब्यावर बसवले. तसंच लोकशाही मूल्य पायदळी तुडवून प्रभाग रचनेत फेरफार केला. त्याद्वारे मुंबईकरांची फसवणूक केली असा आरोप भाजपनं केलाय.

मुंबईत नियम धाब्यावर बसवत प्रभाग फेररचना, भाजपचा आरोप; गांधीगिरी आंदोलनातून निषेध
मुंबईतील भाजप नगरसेवकांचे गांधीगीरी आंदोलन
Follow us
| Updated on: Nov 01, 2021 | 6:09 PM

मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या प्रभाग रचनेतील बदलामुळे राजकारण रंगलेलं पाहायला मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी राजकीय दबावाखाली, पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना डावलून संवैधानिक नियम धाब्यावर बसवले. तसंच लोकशाही मूल्य पायदळी तुडवून प्रभाग रचनेत फेरफार केला. त्याद्वारे मुंबईकरांची फसवणूक केली असा आरोप भाजपनं केलाय. या प्रभाग रचनेचा निषेध म्हणून आज भाजपा नगरसेवकांनी गटनेते प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गांधी टोपी घालून महापालिका आयुक्तांना गुलाबपुष्प देत अनोखं गांधीगिरी आंदोलन केलं. (BJP alleges change of ward structure in Mumbai illegally, Protest by giving flowers to the Municipal Commissioner)

मुंबई महापालिकेच्या फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रभाग पुनर्रचना आराखडा पालिका प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाला सादर केला आहे. शिवसेनेने एका खाजगी एजन्सीकडून आपल्याला अनुकूल अशी प्रभाग रचना बनवून रातोरात आयुक्तांच्या संगनमताने पेन ड्राइव्ह बदलल्याचा गंभीर आरोप भाजप नगरसेवकांनी केला आहे. यामध्ये प्रभागांच्या सीमारेषांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय सोयीसाठी बेकायदेशीर फेरफार करण्यात आली आहे. ह्या पुनर्रचनेमुळे मुंबईकरांची गैरसोय होणार आहे. तसंच पश्चिम उपनगरातील अनेक प्रभागांमध्ये मोठा फेरफार करण्यात आल्याचा दावाही भाजपनं केलाय.

भाजपकडून आंदोलन आणि न्यायालयात जाण्याचा इशारा

नवी प्रभाग पुनर्रचना सत्ताधारी शिवसेनेने केवळ आपला राजकीय फायदा पाहून केली आहे. भ्रष्टाचाराची गटारगंगा अव्याहत वाहत ठेवण्यासाठी आणि पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठीच ही प्रभाग रचना केली असल्याची टीका भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे म्हणून निवडणूक आयोगाने याबाबत पावले उचलून प्रभाग आराखड्याची पडताळणी नि:पक्षपातीपणे करावी अशी मागणी भाजपने लेखी पत्राद्वारे केली आहे. अन्यथा भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, प्रसंगी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात येतील असा इशारा गटनेते शिंदे यांनी दिला आहे.

2011 नंतर जणगणना नाही, फेब्रुवारीत महापालिका निवडणुका

सध्या सन 2011 च्या जनगणनेनुसार नगरपालिकांमध्ये किमान 16 तर जास्तीत जास्त 65 सदस्य संख्या आहे. तर महापालिकांध्ये किमान 65 तर जास्तीत जास्त 175 पर्यंत आहे. मुंबई महापालिके त ही संख्या 227 आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे देशात सन 2011 ची जणगणना अद्याप सुरु होऊ शकलेली नाही. पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चदरम्यान 15 महापालिकांच्या तसेच सुमारे 100 हून अधिक नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत.

इतर बातम्या :

‘इंधन दरवाढीकडे लक्ष जाऊ नये म्हणून आर्यन खाच्या बातम्यांवर जोर’, सुप्रिया सुळेंचा भाजपवर पलटवार

नवाब मलिकांच्या गंभीर आरोपानंतर खळबळ, मुंबई रिव्हर अँथममधून जयदीप राणाचं नाव गायब?

BJP alleges change of ward structure in Mumbai illegally, Protest by giving flowers to the Municipal Commissioner

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.