‘इंधन दरवाढीकडे लक्ष जाऊ नये म्हणून आर्यन खाच्या बातम्यांवर जोर’, सुप्रिया सुळेंचा भाजपवर पलटवार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. आर्यन खान जितके दिवस जेलमध्ये होता, त्या दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे भाव किती वाढले आहेत ते बघा. त्या दरवाढीकडे लक्ष जाऊ नये म्हणून आर्यन खानच्या बातम्या सुरु होत्या, अशी टीका सुळे यांनी केलीय.

'इंधन दरवाढीकडे लक्ष जाऊ नये म्हणून आर्यन खाच्या बातम्यांवर जोर', सुप्रिया सुळेंचा भाजपवर पलटवार
सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Nov 01, 2021 | 5:32 PM

पुणे : देशात पेट्रोलचे भाव 121 रुपयांवर तर डिझेलचे भाव 112 रुपयांच्या वर जाऊन पोहोचले आहेत. या इंधन दरवाढीनं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. तर घरगुती गॅसचे दरही वाढल्यानं गृहिणींचं बजेट बिघडलं आहे. या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. आर्यन खान जितके दिवस जेलमध्ये होता, त्या दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे भाव किती वाढले आहेत ते बघा. त्या दरवाढीकडे लक्ष जाऊ नये म्हणून आर्यन खानच्या बातम्या सुरु होत्या, अशी टीका सुळे यांनी केलीय. (MP Supriya Sule criticizes BJP and central government over petrol and diesel price hike)

पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपने 58 कोटी रुपये सिग्नल रिपेअरिंगसाठी खर्च केले आहेत. कॉपी करुन पास झालेल्या लोकांनी पुणेकरांचं वाटोळं केलंय. आमचं सरकार हे सत्याचं आणि संघर्षाचं सरकार आहे. अजून दिल्लीत आपलं सरकार यायचं आहे. दिल्लीत आपलं सरकार आल्यावर पहिल्यांदा गॅसचे दर कमी करणार, अशी घोषणाच सुप्रिया सुळे यांनी यावेळी करुन टाकली. तसंच संसदेत गॅसचे दर कमी करण्यासाठी मागणी करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

सोमय्यांना टोला, तर फडणवीसांवर अधिक बोलणं टाळलं

अनिल देशमुखांच्या मुद्द्यावरही सुळे यांनी भाष्य केलं. त्यांना ईडीची नोटीस आली होती. म्हणून ते ईडीच्या कार्यालयात गेले आहेत. ही चांगली गोष्ट आहे. आमच्यावर सातत्याने खोटेनाटे आरोप केले जात आहेत. जे एखाद्या संस्थेनं बोलायला हवं ते प्रवक्ते बोलत आहेत, असा टोला सुळे यांनी नाव न घेता किरीट सोमय्यांना लगावला. तर नवाब मलिक यांनी फडणवीसांवर केलेल्या गंभीर आरोपांबाबत बोलताना, मलिक यांनी काय आरोप केले ते मी ऐकलं नाही. त्यांची आजची पत्रकार परिषद पाहिली नाही. आमचं दडपशाहीचं सरकार नाही. देवेंद्र फडणवीस यांना काय बोलायचं तो त्यांचा प्रश्न आहे, असं सुळे म्हणाल्या.

‘पुण्यात पुढचा महापौर राष्ट्रवादीचा’

राष्ट्रवादी काँग्रेसचा नोकरी मेळावा रविवारी पुण्यात घेण्यात आला. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. पत्रकार सांगतात की पुण्यातील लोक भाजपला थकले आहेत. एकदा मतदान केलं, पण महापौरांकडून चांगलं काम झालं नाही. येणाऱ्या निवडणुकीत महापौर राष्ट्रवादीचा होईल, असं लोक सांगत असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. अजितदादांकडून काम करुन घ्या, निवडणुकीच्या कामाला लागा. पुढचा महापौर हा राष्ट्रवादीचाच असेल. प्रचार सुरु करा, असा आदेशच सुळे यांनी कार्यकर्त्यांना दिलाय.

रुपाली चाकणकर यांचं कौतुक

सुप्रिया सुळे यांनी यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचंही कौतुक केलं. रुपाली आजकाल टीव्हीवर जास्त दिसतात. अजितदादांनी त्यांच्यावर विश्वासानं जबाबदारी दिली आहे. महाराष्ट्रात प्रत्येक महिलेला न्याय देण्याचं काम त्या करतील. प्रत्येक महिलेला महिला आयोगा हे आपलं माहेर वाटलं पाहिजे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

इतर बातम्या :

मागासवर्गीय आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांची राष्ट्रपतींकडे तक्रार करणार: नवाब मलिक

नवाब मलिकांच्या गंभीर आरोपानंतर खळबळ, मुंबई रिव्हर अँथममधून जयदीप राणाचं नाव गायब?

MP Supriya Sule criticizes BJP and central government over petrol and diesel price hike

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.