मागासवर्गीय आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांची राष्ट्रपतींकडे तक्रार करणार: नवाब मलिक

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आता थेट राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांची तक्रार राष्ट्रपतींकडे करणार असल्याचा इशारा दिला आहे. (i will complaint against arun halder to president of india, says nawab malik)

मागासवर्गीय आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांची राष्ट्रपतींकडे तक्रार करणार: नवाब मलिक
नवाब मलिक, अल्पसंख्याक मंत्री
Follow us
| Updated on: Nov 01, 2021 | 5:17 PM

मुंबई: राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आता थेट राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांची तक्रार राष्ट्रपतींकडे करणार असल्याचा इशारा दिला आहे. हलदर हे समीर दाऊद वानखेडे यांची भेट घेऊन मीडिया ट्रायल करत आहेत. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. वैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीला कशाची घाई झाली आहे? असा सवाल करतानाच राष्ट्रपतींकडे या सर्व प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं नवाब मलिक यांनी सांगितलं.

नवाब मलिक यांनी प्रेस रिलीज काढून सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. मलिक यांनी अरुण हलदर यांच्यावर टीका करतानाच सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंवरही टीका केली आहे. रामदास आठवले यांनी समीर दाऊद वानखेडे यांची बाजू घेत समर्थन केले हे दुर्दैवी आहे. हलदर हे भाजपाचे नेते आहेत मान्य आहे. परंतु त्यांना जे पद मिळाले आहे. त्या पदाची जबाबदारी आणि कार्य व कर्तव्य काय आहे. आयोगाची कार्यप्रणाली कशी आहे. ज्या पदावर बसलो आहे त्या पदाचे वर्तन कसे हवे हे समजले पाहिजे, असा टोलाही त्यांनी हलदर यांना लगावला.

वानखेडेंचं सर्टिफिकेट मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयातील

आठवले यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी नको त्या गोष्टींवर चर्चा केली. खोटं बोलायचं असेल तर ढंगात बोला जेणेकरून लोकांच्या लक्षात येईल. आजपण मी माझ्या वक्तव्यावर कायम आहे. फर्जीवाडा करुन समीर दाऊद वानखेडे याने सर्टिफिकेट बनवले आहे. त्यांचे सर्टिफिकेट मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आले आहे. यासाठी राज्य सरकारने चौकशी समिती स्थापन केली असून या समितीसमोर माझे म्हणणे मांडणार आहे. या समितीसमोर जो फर्जीवाडा झालाय त्यावर चौकशीनंतर शिक्कामोर्तब होणार आहे. एकदा शिक्कामोर्तब झाल्यावर कायद्यानुसार कारवाई होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

माहिती घेण्याचा अधिकार आयोगाला नाही

अरुण हलदर हे मर्यादेचे उल्लंघन करत आहेत. मुळात ज्याच्यावर अन्याय झाला आहे तो व्यक्ती या आयोगाकडे तक्रार दाखल करतो.त्यानुसार आयोग रिपोर्ट करुन संबंधित व्यक्ती व संस्था यांना समन्स पाठवतात. त्याची चौकशी करुन तो रिपोर्ट संसदेच्या पटलावर ठेवला जातो. त्यामुळे माहिती घेण्याचा किंवा त्याची तपासणी करण्याचा अधिकार मागासवर्गीय आयोगाला नाही, असेही त्यांनी सांगितलं. के. रामास्वामी हे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश होते. त्यांनी देशात जातीच्या दाखल्याचे बोगस प्रकरणे मोठ्याप्रमाणावर बाहेर येऊ लागल्यावर 1994 मध्ये देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात जातपडताळणी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

वानखेडे जरा जास्तच बोलत आहेत

समीर वानखेडे यांनी मला अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत आत टाकण्याची धमकी दिली आहे. जो व्यक्ती दलितच नाही. तो धमकी देत आहे. तो जरा जास्तच बोलत आहे. सर्व व्यक्तींनी आपल्या मर्यादेत राहिले पाहिजे. आपल्या पदाची प्रतिष्ठा सांभाळली पाहिजे असे सांगतानाच दुसर्‍याच्या अधिकाराचे हनन करण्याचा कोणालाही अधिकार नाही. याचीही तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितलं.

गुंडे-फडणवीसांचे घनिष्ठ संबंध

देवेंद्र फडणवीस यांचा एक ‘वाझे’ मुंबईत राहतो, हे मी आधीच सांगितले होते. निलेश गुंडे नामक व्यक्तीचे माजी मुख्यमंत्र्यांसहीत घनिष्ठ संबंध होते. गुंडे याला मुख्यमंत्री निवास, मंत्रालय सर्व ठिकाणी प्रवेश होता. पोलिसांच्या बदल्या, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या गुंडेमार्फत होत होत्या. त्यामाध्यमातून पैसे उकळले जात असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. तसेच फडणवीस जेव्हा पुण्याकडे प्रस्थान करायचे तेव्हा ते गुंडे यांच्या नवी मुंबईतील घरी जाऊन भेट द्यायचे. तिथूनच फडणवीस यांचे मायाजाल चालायचे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वानखेडेंना का आणलं?

भाजपचे सरकार बदलल्यानंतर सर्व केंद्रीय यंत्रणांच्या कार्यालयात हाच ‘फडणवीसांचा वाझे’ फिरताना दिसला आहे. समीर दाऊद वानखेडे हा मागच्या 14 वर्षांत याच शहरात विविध भागात काम करत आहे. त्याची बदली करण्यामध्येही फडणवीस यांचा हात आहे. निरपराध लोकांना गुन्ह्यात अडकवण्यासाठी वानखेडे यांना आणले गेले, असा आरोपही त्यांनी केला.

ड्रग्जचा व्यवसाय फडणवीसांच्या इशाऱ्यावरच

मोठमोठे ड्रग पेडलर तसेच काशिफ खान, रिषभ सचदेवा, आमिर फर्नीचरवाला, प्रतीक गाभा यांना सोडून देण्यात आले होते. फडणवीस यांच्या इशाऱ्यावर ड्रग्जचा व्यवसाय सुरु आहे. प्रतीक गाभा हा कोण आहे? तो कुणासाठी पार्ट्या आयोजित करतो? हे सर्व येणाऱ्या दिवसात आम्ही जगजाहीर करु, असे आव्हानही नवाब मलिक यांनी दिले. पुढील काही दिवसांत आणखी ड्रग्ज पेडलर लोकांचे फोटो आम्ही समोर आणणार आहोत, ज्यांचा भाजपशी संबंध आहे, असेही त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:

समीर वानखेडे दिल्लीत मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांच्या भेटीला, राज्य सरकारकडून कागदपत्रं मागवली जाणार

Special Story ! अतिवृष्टीतील नुकसानीच्या खुणा, एकाच जिल्ह्यात 30 दिवसांमध्ये 25 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

अनिल देशमुख ईडीसमोर हजर का झाले? सुधीर मुनगंटीवारांनी सांगितली तीन कारणं

(i will complaint against arun halder to president of india, says nawab malik)

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.