राज्यस्तरीय कबड्डी चषकाच्या बॅनरवर फडणवीस-अजितदादांचा एकत्रित फोटो, चर्चांना उधाण

कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने लावलेल्या बॅनरवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Devendra Fadnavis Ajit pawar banner in kalyan) यांचा एकत्रित फोटो पाहायला मिळत आहे.

राज्यस्तरीय कबड्डी चषकाच्या बॅनरवर फडणवीस-अजितदादांचा एकत्रित फोटो, चर्चांना उधाण
Follow us
| Updated on: Dec 29, 2019 | 10:08 AM

कल्याण : महाराष्ट्रातील राजकीय सत्तानाट्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने एकत्र येत सत्तास्थापन केली. यानंतर आता विरोधी पक्ष भाजपकडून महाविकासआघाडीवर जोरदार टीका सुरु (Devendra Fadnavis Ajit pawar banner in kalyan) आहे. त्यातच कल्याणमध्ये एका कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने लावलेल्या बॅनरवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Devendra Fadnavis Ajit pawar banner in kalyan) यांचा एकत्रित फोटो पाहायला मिळत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

कल्याणमध्ये नुकतंच देवेंद्र फडणवीस चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेनिमित्ताने कल्याणमध्ये ठिकठिकाणी बॅनरबाजी केली आहे. त्यात देवेंद्र फडणवीस, गणेश नाईक, कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे फोटो आहे. त्यासोबतच अजित पवारांचाही फोटो या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे कल्याणकरांच्या भुवया उंचावल्या आहेत.

विशेष म्हणजे हा बॅनर या मैदानातील मंचाच्या दोन्ही बाजूला लावण्यात आला आहे. यावर देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचा फोटो शेजारी लावण्यात आला आहे. तसेच यावर ‘आपला माणूस, आपला आमदार’ असेही लिहिले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली (Devendra Fadnavis Ajit pawar banner in kalyan) आहे.

पुण्यात जिल्ह्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या नियोजनासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीला सुरुवात होण्यापूर्वी अजित पवार अध्यक्षस्थानी येऊन बसले. यानंतर काही वेळाने चंद्रकांत पाटील या ठिकाणी आले आणि ते अजित पवारांच्या बाजूला जाऊन बसले. त्यावेळी अजित पवारांनीही “बसू द्या, आमच्या शेजारी, त्यांचं आमच्यावर प्रेम आहे.” असं गिरीश बापट यांच्याशी हातवारे करत म्हणाले होते.

दरम्यान, यापूर्वीही देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सत्तानाट्यानंतर एकाच मंचावर, एकमेकांच्या शेजारी बसल्याचं पाहायला मिळालं. सोलापूर जिल्ह्यातील माढा इथं एका शाही विवाह सोहळ्यात या दोघांनी हजेरी लावली. करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त दोघेही एकत्र आले होते. सत्तानाट्यानंतर दोघेही एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आलं (Devendra Fadnavis Ajit pawar banner in kalyan) होतं.

लग्नमंडपात फडणवीसांशी काय चर्चा झाली, माढ्यातील प्रश्नाचं उत्तर अजित पवारांनी बारामतीत दिलं!

अजित पवार-देवेंद्र फडणवीस यांची भेट, म्हणजे कोणत्याही क्षणी ‘गोड’ बातमी : सुधीर मुनगंटीवार

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.