AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंढरपूर पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट, भाजपकडून राम शिंदेंना तिकीट देण्याच्या हालचाली

या पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण, भाजपकडून माजी मंत्री राम शिंदे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाणार असल्याची चर्चा आता मतदारसंघात पाहायला मिळत आहे.

पंढरपूर पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट, भाजपकडून राम शिंदेंना तिकीट देण्याच्या हालचाली
पंढरपूर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून राम शिंदे यांच्या नावाची चर्चा
| Updated on: Mar 24, 2021 | 3:47 PM
Share

पंढरपूर : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना रंगणार असल्याचं पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. अशातच या पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण, भाजपकडून माजी मंत्री राम शिंदे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाणार असल्याची चर्चा आता मतदारसंघात पाहायला मिळत आहे.(BJP is likely to field former minister Ram Shinde for the Pandharpur assembly by-election)

राष्ट्रवादीकडून पार्थ पवारांच्या नावाची चर्चा

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचं अकाली निधन झाल्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादीकडून भारत भालके यांच्या जागी त्यांच्या पत्नी जयश्री भालके किंवा मुलगा भगिरथ भालके यांनी उमेदवारी दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. पण उमेदवारी जाहीर करण्यासाठी राष्ट्रवादीकडून उशीर का केला जातोय? असा सवालही आता विचारला जात आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूरमध्ये बैठक घेतली. मात्र, त्यावेळी उमेदवारी जाहीर केली नाही. त्यानंतर दिल्लीत शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पार्थ पवार यांच्या नावाचीही चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. अशावेळी भालके कुटुंबातील उमेदवार जाहीर करण्यास होत असलेला उशीर म्हणजे पार्थ पवार यांच्यासाठी वातावरण निर्मिती असल्याची शंका उपस्थित केली जात आहे.

भाजपकडून राम शिंदे मैदानात?

दुसरीकडे भाजपचा उमेदवारही अद्याप निश्चित होऊ शकलेला नाही. भाजप प्रभारींनी बैठक घेत उमेदवार घोषित करणार असल्याचं सांगितलं. भाजपकडून विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. असं असताना आता माजी मंत्री आणि कर्जत-जामखेड विधानसभा निवडणुकीत रोहित पवारांविरोधात पराभव स्वीकारावा लागलेले डॉ. राम शिंदे यांचंही नाव भाजपकडून पुढे केलं जात आहे.

पंढरपूर-मंगळवेठा विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाचं प्राबल्य आहे. त्यामुळे राम शिंदे यांना उमेदवारी देत भाजप जातीचं समीकरण जुळवण्याच्या आणि मतदारसंघात विजय मिळवण्याच्या विचारात असल्याचं बोललं जात आहे. राम शिंदे यांच्या नावाला जिल्ह्यातील भाजपचे नेते माजी मंत्री सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांची अनुकूलता असल्याचं बोललं जात आहे.

पंढरपुरात तिरंगी लढत होणार?

भाजपकडून राम शिंदे यांना उमेदवारी मिळाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून भालके कुटुंबाला उमेदवारी टाळत पार्थ पवार यांना उमेदवारी दिली गेली, तर भगिरथ भालके हे अपक्ष निवडणूक लढवू शकतात. त्यामुळे पंढरपूर-मंगळवेठा मतदारसंघाची पोटनिवडणूक तिरंगी होण्याची शक्यताही जाणकार व्यक्त करत आहेत.

पोटनिवडणुकीचा कार्यक्रम –

>> अर्ज भरण्यास सुरुवात – 23 मार्च 2021 >> अर्ज भरण्याची अंतिम तारीख – 30 मार्च 2021 >> अर्जांची छाननी – 31 मार्च 2021 >> अर्ज मागे घेण्याची तारीख – 3 एप्रिल 2021 >> मतदान – 17 एप्रिल 2021 >> निवडणूक निकाल – 2 मे 2021

संबंधित बातम्या :

Pandharpur Assembly by-election : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर, 17 एप्रिलला मतदान, 2 मे रोजी गुलाल!

Pandharpur Assembly By-Election : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून पार्थ पवारांच्या नावाची चर्चा?

BJP is likely to field former minister Ram Shinde for the Pandharpur assembly by-election

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.