AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pandharpur Assembly By-Election : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून पार्थ पवारांच्या नावाची चर्चा?

या बैठकीत पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. स्थानिक पातळीवरुन पार्थ पवार यांच्या उमेदवारीचा आग्रह धरला जात असल्याचं बोललं जात आहे.

Pandharpur Assembly By-Election : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून पार्थ पवारांच्या नावाची चर्चा?
| Updated on: Mar 21, 2021 | 10:58 PM
Share

मुंबई : राजधानी दिल्लीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. या बैठकीत पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. स्थानिक पातळीवरुन पार्थ पवार यांच्या उमेदवारीचा आग्रह धरला जात असल्याचं बोललं जात आहे.(Parth Pawar’s name was discussed in the meeting of NCP for Pandharpur Assembly by-election)

दिल्लीतील बैठकीत पार्थ पवारांच्या नावाची चर्चा?

भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक लागली आहे. महाविकास आघाडीकडून पंढरपूरची जागा राष्ट्रवादी लढवणार आहे. अशावेळी उमेदवार निवडीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पंढरपुरात एक बैठक पार पडली. त्यावेळी कार्यकर्त्यांमध्ये काही राडा झाल्याचंही समोर आलं. पंढरपूरमधील बैठक आटोपल्यानंतर अजितदादा आणि जयंत पाटील तातडीने दिल्लीला रवाना झाले. 6 जनपथवरील पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची जवळपास अडीच तास बैठक पार पडली.

बैठक पार पडल्यानंतर जंयत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत पंढरपूरमधून पार्थ पवार यांच्या नावाचाही विचार करण्याबाबत चर्चा झाल्याचं कळतंय. स्थानिक स्तरावनर पार्थ यांच्या उमेदवारीचा आग्रह धरला जात आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तसा ठरावही केल्याचं कळतंय. पण पार्थ यांना पंढरपुरातून उमेदवारी देण्याबाबत अजित पवार राजी नसल्याची माहिती मिळत आहे.

भगिरथ भालके यांना उमेदवारी?

दिवंगत आमदार भारत भालके यांच्या जागेवर त्यांचे पुत्र भगीरथ भालके किंवा त्यांच्या पत्नी जयश्री भालके यांना राष्ट्रवादीवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपकडून संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान औताडे यांना उमेदवारी दिली जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांची भूमिका अद्याप स्पष्ट नाही. पोटनिवडणुकीत परिचारक गटाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. पण परिचारक गट सध्या पोटनिवडणूक लढण्याच्या मन:स्थितीत नसल्याचं बोललं जात आहे.

17 एप्रिलला मतदान, 2 मे रोजी गुलाल!

>> अर्ज भरण्यास सुरुवात – 23 मार्च 2021 >> अर्ज भरण्याची अंतिम तारीख – 30 मार्च 2021 >> अर्जांची छाननी – 31 मार्च 2021 >> अर्ज मागे घेण्याची तारीख – 3 एप्रिल 2021 >> मतदान – 17 एप्रिल 2021 >> निवडणूक निकाल – 2 मे 2021

संबंधित बातम्या :

भारत भालकेंच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणुकीची तयारी, राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी?

अजितदादा आणि जयंत पाटलांच्या सभेत भगीरथ भालके समर्थकांकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची धुलाई

Parth Pawar’s name was discussed in the meeting of NCP for Pandharpur Assembly by-election

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.