“झुकली रे झुकली मराठी बाणा सांगणारी सेना सत्तेसाठी काँग्रेस समोर झुकली”

झुकली रे झुकली मराठी बाणा सांगणारी सेना सत्तेसाठी काँग्रेस समोर झुकली, अशी बोचरी टीका भाजप नेते आशिष शेलार (Aashish shelar criticized on shivsena) यांनी शिवसेनेवर केली आहे.

झुकली रे झुकली मराठी बाणा सांगणारी सेना सत्तेसाठी काँग्रेस समोर झुकली
Follow us
| Updated on: Dec 15, 2019 | 1:17 PM

मुंबई : झुकली रे झुकली मराठी बाणा सांगणारी सेना सत्तेसाठी काँग्रेस समोर झुकली, अशी बोचरी टीका भाजप नेते आशिष शेलार (Aashish shelar criticized on shivsena) यांनी शिवसेनेवर केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल (14 डिसेंबर) सावरकरांबद्दल वादग्रस्त विधान केले. त्यामुळे सर्वच स्तरातून राहुल गांधींवर टीका होत आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनीही ट्वीट करत काँग्रेसला इशारा दिला.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने एकत्र येत सत्तास्थापन केली आहे. त्यामुळे आता राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे भाजपकडून शिवसेनेवर निशाणा साधला जात आहे. राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे आता शिवसेनेवरही टीका (Aashish shelar criticized on shivsena) होऊ लागली आहे.

“नाही धार “सच्चाई”कारांच्या शब्दांना आज दिसली. “रोखठोक” लेखणी त्यांच्याकडेच पाहुन म्हणे हसली. सत्ता पहा कशी आज सावरकरांच्या अपमानापेक्षा मोठी ठरली. नागू सयाजी वाडीतून का नाही महाराष्ट्र धर्माची उजळणी झाली छे..छे..झुकली रे झुकली मराठी बाणा सांगणारी सेना सत्तेसाठी काँग्रेस समोर झुकली! “, असं ट्वीट आज आशिष शेलार यांनी केले आहे.

आशिष शेलार यांनी केलेल्या ट्वीटमुळे आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तिन्ही वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष एकत्र येऊन त्यांनी सत्ता स्थापन केली आहे. त्यात राहलु गांधींच्या वक्तव्यामुळे आता विरोधी पक्षाकडून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे.

नेमक प्रकरण काय?

हैद्राबाद बलात्कार प्रकरणानंतर देशात सर्वत्र संतापाची लाट पसरली होती. यावर राहुल गांधी आपले मत व्यक्त करताना त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. देशात मेक इन इंडिया नसून रेप इन इंडिया सुरु आहे. राहुल गांधींच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर भाजपकडून तसेच महिला खासदारांकडून टीका करण्यात आली. त्यांनी माफी मागावी अशी मागणीही केली जात होती. यावर राहुल यांनी काल भारत बचाओ आंदोलना दरम्यान म्हटले, मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राहुल गांधींवर जोरदार टीका होत आहे.

Non Stop LIVE Update
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.