चंद्रकांत पाटलांनी छत्रपतींना उपकाराची आठवण करुन दिली: संजय राऊत

महाराष्ट्राचे राजकारण अस्थिर करण्यासाठी विरोधी पक्ष मराठा आरक्षणाचा हत्याराप्रमाणे वापर करत असतील तर ते रोखले पाहिजे. | Sambhaji raje chhatrapati

चंद्रकांत पाटलांनी छत्रपतींना उपकाराची आठवण करुन दिली: संजय राऊत
चंद्रकांत पाटील आणि संभाजीराजे छत्रपती
Follow us
| Updated on: May 31, 2021 | 8:37 AM

मुंबई: चंद्रकांत पाटील यांनी छत्रपतींना उपकाराची आठवण करुन दिली, ही गोष्ट लोकांना रुचलेली नाही. त्यामुळे अनेक लोक नाराज झाले आहेत, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. संभाजीराजे छत्रपती (sambhaji raje chhatrapati) हे सध्या राज्यसभेचे सदस्य आहेत. छत्रपतींची ही नियुक्ती राष्ट्रपतींकडून भारतीय जनता पक्षाने करुन घेतली आहे. मात्र, आता चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी छत्रपतींना या उपकाराची आठवण करुन दिली. त्यामुळे आता छत्रपती काय भूमिका घेतात, हे पाहावे लागले, असे राऊत यांनी म्हटले आहे. ( BJP insult of Sambhaji raje chhatrapati says Sanjay Raut)

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखातून मराठा आरक्षणाची लढाई आता दिल्लीच लढणे कसे गरजेचे आहे, याविषयी भाष्य करण्यात आले आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा तिढा जसा दिल्लीत पडला होता तसाच मराठा आरक्षणाचा तिढा दिल्लीतच पडला पाहिजे. हा तिढा दिल्लीनेच सोडवावा. महाराष्ट्राला तो अधिकार नाही. संभाजीराजे छत्रपती यांनी आता याप्रश्नी लढाईचे मैदान दिल्लीतच ठरवले तर निकाल लागेल.

संभाजी छत्रपती आणि भाजपात मतभेद वाढतायत? पाटील म्हणतात, पक्षाने किती सन्मान दिला हे संभाजीराजे सांगत नाहीयेत!

राजधानी दिल्लीत 9 ऑगस्ट रोजी मराठा समाजाची गोलमेज परिषद घेण्याचे कोल्हापूरच्या छत्रपतींनी ठरवले आहे. ही परिषद राजकारणविरहीत व्हावी. बहुजन समाजाचा बुलंद आवाज म्हणून दिल्लीला त्या गोलमेज परिषदेची दखल घ्यावीच लागेल. मराठा आरक्षणप्रश्नी कोणीही दुटप्पी भूमिका घेऊ नये. महाराष्ट्राचे राजकारण अस्थिर करण्यासाठी विरोधी पक्ष मराठा आरक्षणाचा हत्याराप्रमाणे वापर करत असतील तर ते रोखले पाहिजे, असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.

मराठा आरक्षणाच्या हुकूमाची पाने मोदींच्याच हाती: संजय राऊत

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्र सरकारच्या हातात टोलवला आहे. मराठा आरक्षणाची हुकूमी पानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच हाती आहेत. त्यांनीच ही पानं टाकावीत, असं संजय राऊत यांनी म्हटलं होते.

महाराष्ट्रातील प्रत्येक नेता संभाजी छत्रपती यांच्या मताशी सहमत आहे. त्यामुळे सर्व उठून मोदींकडे जाऊया. त्यात भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी असा विषय नाही. सर्वांनीच मोदींना भेटलं पाहिजे. कारण मोदींच्या हातीच आता हुकूमाची पानं आहेत. त्यांनीच ती टाकावी, असे राऊत यांनी सांगितले होते.

संबंधित बातम्या:

राजे, मराठा आरक्षणाचा विषय वाटेल तसा वापरायला तुम्हाला ठेका दिला नाही; निलेश राणेंची टीका

‘आरक्षणासाठी लढ्याचा माहौल निर्माण करावा लागेल, मराठ्यांच्या स्वाभिमानाची धडक दिल्लीच्या दरवाजावरच पडलीच पाहिजे’

संभाजीराजेंची अवहेलना भाजपला महागात पडणार; शिवसेना खासदाराचं वक्तव्य

( BJP insult of Sambhaji raje chhatrapati says Sanjay Raut)

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.