जयंतराव, फुकटातलं मिळालं ते हजम करा, आमची काळजी करू नका; चंद्रकांत पाटलांचा टोला
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. (bjp leader chandrakant patil taunts jayant patil)

पुणे: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. आम्ही विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका प्रखरपणे बजावत आहोत. त्याची जयंतरावांनी काळजी करू नये. फुकटातलं जे मिळालंय ते व्यवस्थित हजम करा, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. (bjp leader chandrakant patil taunts jayant patil)
पश्चिम महाराष्ट्र भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडल्यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना चंद्रकांत पाटील यांनी हा टोला लगावला. प्रखर विरोधक म्हणून आम्ही आमची भूमिका बजावत आहोत. जयंतरावांनी आमची काळजी करू नये. जे फुकटात मिळालं ते व्यवस्थित हजम करा. आमची चिंता करू नका, असा टोला लगावतानाच फुकटात मिळालेली सत्ता जास्तीत जास्त काळ कशी राहील यासाठी दिवसरात्र मेहनत घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला. पुढची चार वर्षे आम्हीच सत्तेत राहणार असून आमदारांनी पक्ष सोडून जाऊ नये म्हणूनच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सरकार लवकरच पडणार असल्याचं बोलावं लागत असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली होती. त्यावर चंद्रकांत पाटलांनी हा टोला लगावला.
यावेळी त्यांनी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरही भाष्य केलं. प्रत्येक निवडणुकीत चॅलेंज असतच. मात्र तरीही ही निवडणूक सहज काढू असा विश्वास, त्यांनी व्यक्त केला. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी यापूर्वी आम्ही चांगले काम केले आहे, असं सांगतानाच कौशल्य विकासावर आम्ही अधिक काम करू. सरकारी खात्यात रिकाम्या जागा भरण्यासाठीही प्रयत्न करू, असंही ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंना दिल्लीत पाठवू
बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न राबवा, असा सल्ला शिवसेनेने बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना दिला आहे. त्याबाबत पाटील यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा, त्यांना सल्ला द्यायला दिल्ली पाठवू. इथं बोलून काय फायदा? त्यांना सल्ला द्यायला अमेरिकेतही पाठवलं जाणार आहे. त्यासाठी तिकिटाचा बंदोबस्त करत आहे, असा चिमटाही त्यांनी काढला. ठाकरे सरकार गोंधळलेलं सरकार आहे. सार्थी रद्द केली, अण्णासाहेब पाटीर महामंडळ बरखास्त केलं, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण आणि महिला अत्याचारांसह विविध मुद्द्यांवर या सरकारचा गोंधळ आहे. या सरकारला कोणताही निर्णय घेता येत नाही, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 12, 2020
संबंधित बातम्या:
भाजप हा माझ्या बापाचा पक्ष, त्याचा मला अहंकार नाही तर प्रेम : पंकजा मुंडे
दानवे प्रीतमताईंचा फॉर्म भरायला आले, त्या जिंकल्या, माझ्यावेळी आले नाहीत, मी हरले : पंकजा
मंदिरं उघडण्यासाठी भावना भडकवून उद्रेक करणे चुकीचे; वारकरी साहित्य परिषदेची भूमिका
(bjp leader chandrakant patil taunts jayant patil)
