Video | सुप्रिया सुळेंवर काय वेळ आलीये? चिमुरड्यांजवळ मतदानाचा निरोप? चित्रा वाघ यांचं ट्विट चर्चेत!

मंजिरी धर्माधिकारी, Tv9 मराठी

Updated on: Jan 24, 2023 | 3:21 PM

सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी पारगाव मेमाणे येथील शाळेत संविधान कट्ट्याचं उद्घाटन केलं. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधून केलेल्या भाषणात सदर वक्तव्य केलं.

Video | सुप्रिया सुळेंवर काय वेळ आलीये? चिमुरड्यांजवळ मतदानाचा निरोप? चित्रा वाघ यांचं ट्विट चर्चेत!
Image Credit source: social media

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर काय वेळ आली आहे… आपल्याला मतदान करा, असा निरोप ज्ञानार्जन करण्यासाठी आलेल्या चिमुरड्यांजवळ द्यावा लागतोय, अशा शब्दात भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी पारगाव मेमाणे येथील शाळेत संविधान कट्ट्याचं उद्घाटन केलं. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधून केलेल्या भाषणात सदर वक्तव्य केलं. या वक्तव्याचा व्हिडिओ चित्रा वाघ यांनी ट्विट केलाय.

काय आहे व्हिडिओत?

सुप्रिया सुळेंच्या भाषणात त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. मी नेमकी कोण आहे, कुठे काम करते, हे सुप्रिया सुळे यांनी लहान मुलांना समजावून सांगितलं.

मी दोन कामं करते. मी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये काम करते तसंच तुमची खासदार आहे. तुमचे आई-वडील मला मतदान करतात ना? (मुलं हो…. म्हणतात..) कशावरून? घरून विचारून आला होतात का? आता घरी जाऊन विचारा… मागच्या वेळेला मतदान केलं नसेल तर २०२४ मध्ये करायला सांगा.. आज घरी जाऊन हे माझं काम करा, असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी गंमतीत केलं.. त्यानंतर हा झाला गंमतीचा भाग, पण हे सांगण्यासाठी मी खरच आलेले नाही, असं स्पष्टीकरणही सुप्रिया सुळे यांनी दिलंय.

चित्रा वाघ यांचं ट्विट काय?

सुप्रिया सुळे यांनी गमतीत केलेल्या या वक्तव्याचा व्हिडिओ चित्रा वाघ यांनी ट्विट केलाय. त्यावर त्यांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, ‘ ज्ञानार्जन करणाऱ्या निरागस चिमुड्यांना ‘आपल्या आई-वडिलांना मला मतदान करा’, हे सांगायची वेळ @supriya_sule ताईंवर आलीये..? याच ताईंना दोनच दिवसांपूर्वी मोदीजींची काळजी वाटत होती.. खरी वेळ स्वतःची काळजी करण्याची आलीये तर…

इथे पहा व्हिडिओ…

सुप्रिया सुळेंचं मोदींवरचं भाष्य काय?

मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा झाला. सुप्रिया सुळे यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली होती. भाजपचे आतापर्यंत अनेक नेते पाहिले. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, अरुण जेठली, यशवंत सिन्हा, सुषमा स्वराज यांच्यासारखे मोठे नेते पाहिले. मात्र आज भाजपात असे नेते नाहीत…

बिच्चारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काळजी वाटते.. सरपंच पदाच्या निवडणुकांपासून देशातल्या कोणत्याही निवडणुकांसाठी मोदींना धावपळ करावी लागते. पक्षासाठी ते खूप कष्ट घेतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय भाजपकडे दुसरा नेताच नाही, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला होता.

त्यामुळे सुप्रिया सुळेंचा व्हिडिओ ट्विट करत चित्रा वाघ यांनी त्यांच्यावरच निशाणा साधलाय. मोदींची काळजी करणाऱ्या ताईंनी आधी स्वतःची काळजी करावी, असा सल्ला त्यांनी दिलाय.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI