AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सत्ता लोकांना भ्रष्ट करत नाही, तर…अमृता फडणवीसांची महाविकासआघाडीवर खोचक टीका

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी महाविकासआघाडीवर टीका केली. (Amruta Fadnavis on Mumbai Power Cut Issue)

सत्ता लोकांना भ्रष्ट करत नाही, तर...अमृता फडणवीसांची महाविकासआघाडीवर खोचक टीका
| Updated on: Oct 13, 2020 | 9:13 AM
Share

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई आणि लगतच्या परिसरातील अनेक भागांतील वीजप्रवाह सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास अचानकपणे खंडित झाला. यानंतर सरकारसह सर्व मुंबईकरांची एकच तारांबळ उडाली. मुंबई परिसरात वीज पुरवठा खंडीत झाल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी महाविकासआघाडीवर टीका केली. (Amruta Fadnavis on Mumbai Power Cut Issue)

“सत्ता लोकांना भ्रष्ट करत नाही,’ तर लोकच सत्तेला भ्रष्ट करतात, अशी खोचक टीका अमृता फडणवीस यांनी केली आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरुन महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला.

मुंबई आणि लगतच्या परिसरातील अनेक भागांतील वीजप्रवाह काल अचानकपणे खंडित झाला. लालबाग, परळ, अंधेरी, दादर, ठाणे, वडाळा आणि नवी मुंबई या भागातील लाईट गेली. ग्रीड फेल्युअरमुळे हा बिघाड झाला होता. अचानक लाईट गेल्यामुळे मुंबईतील पश्चिम आणि मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. अनेक लोक ट्रेन सध्या ट्रॅकवर उभ्या आहेत. याशिवाय, मुंबई परिसरात असणाऱ्या कॉर्पोरेट कार्यालयांमधील कामकाजही लाईट गेल्यामुळे ठप्प झाले.

सध्या मध्य, पश्चिम आणि हार्बर अशा तिन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी ट्रेनमध्ये अडकून पडले आहेत. ट्रेनमधील पंखे आणि लाईटही बंद झाले आहेत. याशिवाय, रस्त्यावरील सिग्नल आणि सीसीटीव्ही यंत्रणाही पूर्णपणे बंद पडली आहे.

दरम्यान मुंबईतील वीजपुरवठा जवळपास अडीच तासांपेक्षा अधिक काळाने पूर्ववत सुरु झाला. मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई परिसरातील वीजपुरवठा काही कालावधीनंतर हळूहळू सुरु झाला. वीजपुरवठा सुरळीत झाल्याने ठप्प झालेली लोकल रेल्वेची वाहतूकही पूर्वपदावर आली. (Amruta Fadnavis on Mumbai Power Cut Issue)

संबंधित बातम्या : 

Mumbai Power Cut | मुंबईतील वीज गायब, नेमकं कारण काय?

Mumbai Power Cut | मुंबई-ठाणे थांबले; पहिल्यांदाच सर्वाधिक वेळ बत्तीगुल

mumbai power cut ! मुंबई-ठाण्याला विजेचा झटका, रेल्वे, इंटरनेट ठप्प; रुग्णालयांनाही फटका

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.