AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ खडसेंचाही फोन टॅप झाल्याचा आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचाही फोन टॅप केल्याचा आरोप होत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ (Eknath khadse Phone Tap) उडाली आहे.

एकनाथ खडसेंचाही फोन टॅप झाल्याचा आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ
| Updated on: Feb 05, 2020 | 10:03 PM
Share

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचाही फोन टॅप केल्याचा आरोप होत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ (Eknath khadse Phone Tap) उडाली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात विरोधकांप्रमाणे खडसेंचाही फोन टॅप करण्यात आला, अशी बातमी एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे. या सर्व प्रकरणी उद्या (6 फेब्रुवारी) बोलेन, अशी प्रतिक्रिया खडसेंनी दिली आहे.

महाराष्ट्रातील काही नेत्यांसह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर विरोधी पक्षातील नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते.

याप्रकरणी अनिल देशमुख यांनी एक चौकशी समिती नेमली आहे. या समितीत दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दोन अधिकाऱ्यांच्या समितीमध्ये श्रीकांत सिंग आणि अमितेश कुमार हे दोन अधिकारी आहेत. कोण कोण अधिकारी इस्त्रायलला गेले होते त्याचा तपास होईल. चौकशी समितीला सहा आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे.

एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया

फोन टॅपप्रकरणी एकनाथ खडसे यांना विचारले असता, त्यांनी “मी याबाबत उद्या बोलेन,” अशी प्रतिक्रिया दिली.

फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे हे महसूल मंत्री होते. मात्र त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांना मंत्रिपद सोडावे लागले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकांपूर्वी आणि त्यानंतरही खडसेंनी भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली (Eknath khadse Phone Tap) होती.

दरम्यान, ऑक्टोबर 2019 मध्ये इस्त्राईलच्या एनएसओ ग्रुपच्या पिगासिस सॉफ्टवेअर वापरुन 1400 लोकांची हेरगिरी केल्याची माहिती  व्हॉट्सअॅपनं दिली होती. यात 121 भारतीयांचाही समावेश होता. त्यानंतर जगभरात याचे पडसाद उमटले. भारतातही राजकीय नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांचे आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप झाला होता.

ठाकरे सरकारनं सत्तास्थापनेनंतर फडणवीस सरकारच्या काळातील अनेक मोठ्या निर्णयांना पलटवलं आहे. तसेच फडणवीस सरकारवर झालेल्या अनेक आरोपांची नव्यानं चौकशी करण्यास सुरुवात केली. आता हेरगिरीप्रकरणाची चौकशीही सुरु होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अनेक खुलासे होण्याची शक्यता (Eknath khadse Phone Tap) आहे.

संबंधित बातम्या :

भाजपने फोन टॅप केले, आता समिती चौकशी करेल, चौकशी अधिकाऱ्यांची नावं गृहमंत्र्यांकडून जाहीर

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...