मी लढत असलेली लढाई एक प्रकारची क्रांती, आता शांत बसणार नाही : किरीट सोमय्या

मी लढत असलेली एक प्रकारची क्रांती आहे. मी आता शांत बसणार नाही. माझी लढाई घोटाळेबाजांविरोधात आहे. मी यांचे घोटाळे बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. ठाकरे सरकारची दादागिरी सुरु आहे. पण ही दादागिरी जास्त दिवस चालणार नाही, असं किरीट सोमय्या म्हणाले.

मी लढत असलेली लढाई एक प्रकारची क्रांती, आता शांत बसणार नाही : किरीट सोमय्या
किरीट सोमय्या

मुंबई : कराडमधून परतल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्यांचं त्यांच्या होम ग्राऊंडवर म्हणजेच मुलुंडमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. ‘किरीटजी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं…’ अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणादून सोडला होता. कार्यकर्त्यांनी दिलेल्या उर्जेनंतर किरीट सोमय्या देखील चार्ज झाले. त्यांनी पुन्हा सकाळचाच पाढा वाचत ठाकरे सरकारवर टीकेची तोफ डागली आणि यावेळी मात्र शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याके मोर्चा वळवत त्यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला. मुंबईत पाऊल ठेवताच पुन्हा त्याच आवेशाने त्यांनी ठाकरे सरकारच्या मंत्र्यांवर आणि नेत्यांविरोधात आरोपांच्या फैरी झाडल्या.

ठाकरे सरकारने भ्रष्टाचारयुक्त महाराष्ट्र बनविला. कोरोनाकाळात सरकारकडून प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला. रेमडेसिव्हीर, औषधांमध्ये घोटाळे केले. सरकारने मयताच्या टाळूवरचं लोणी खाल्लं. कोरोना काळात ठाकरे सरकारने स्व:तचे खिसे भरले,  पण आम्ही महाराष्ट्र घोटाळेमुक्त, भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करुन दाखवू, असं सोमय्या म्हणाले.

माझी लढाई घोटाळेबाजांविरोधात, आता शांत बसणार नाही

मी लढत असलेली एक प्रकारची क्रांती आहे. मी आता शांत बसणार नाही. माझी लढाई घोटाळेबाजांविरोधात आहे. मी यांचे घोटाळे बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. ठाकरे सरकारची दादागिरी सुरु आहे. पण ही दादागिरी जास्त दिवस चालणार नाही. पवार आणि ठाकरेंचे मुश्रीफांना वाचविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण मी आता थांबणार नाही. भ्रष्टाचारी मंत्र्यांवर कारवाई करावीच लागणार, असंही सोमय्या म्हणाले.

संजय राऊतांवर सोमय्यांचा भ्रष्टाचाराचा आरोप

संजय राऊत यांच्यावर सोमय्यांनी गैरव्यवहाराचे आरोप केले. “शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी काल किरीट सोमय्या यांच्यासोबत जे झाले, त्याचा आमच्याशी काहीही संबंध नाही, असं भाष्य केले. हे तेच आहेत ज्यांनी बीएमएसी बँकेच्या डीपॉझिटरचे 55 लाख रुपये ढापले होते. हाच चोरीचा माल त्यांना परत करावा लागत होता,” असे सोमय्या यांनी विधान केले. म्हणजेच संजय राऊत यांनी बिएमसी बँकेमध्ये 55 लाख रुपयांचा गैरव्यवहार केला होता असा अप्रत्यक्ष आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

हे ही वाचा :

किरीट सोमय्यांकडून आरोपांच्या फैरी, अजित पवारांनी एका वाक्यात निकाल लावला!

आता महाविकास आघाडीही वात पेटवणार, फडणवीस सरकारच्या काळातील फायली काढणार; नाना पटोलेंचा इशारा

Goa Election : काही पक्षात अराजकता, काँग्रेसनं आत्मपरीक्षण करावं, फडणवीसांचं गोव्यात वक्तव्य

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI