हिम्मत असेल तर आता माझा कोल्हापूर दौरा अडवून दाखवा, किरीट सोमय्यांचं महाविकास आघाडीला आव्हान

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 26, 2021 | 12:15 PM

सामनाच्या रोखठोक सदरातून विरोधकांची हास्यजत्रा या मथळ्यातून संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांच्या दौऱ्याचा समाचार घेतला. यावर 'हिम्मत असेल तर उद्यापासून सुरु होणारा कोल्हापूर दौरा अडवून दाखवा' असं आव्हान किरीट सोमय्या यांनी दिलंय.

हिम्मत असेल तर आता माझा कोल्हापूर दौरा अडवून दाखवा, किरीट सोमय्यांचं महाविकास आघाडीला आव्हान
किरीट सोमय्या

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्यावरुन चांगलंच राजकारण तापलं आहे. सामनाच्या रोखठोक सदरातून विरोधकांची हास्यजत्रा या मथळ्यातून संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांच्या दौऱ्याचा समाचार घेतला. यावर ‘हिम्मत असेल तर उद्यापासून सुरु होणारा कोल्हापूर दौरा अडवून दाखवा’ असं आव्हान किरीट सोमय्या यांनी दिलंय. जर किरीट सोमय्याची हास्य जत्रा आहे किंवा विरोधी पक्षातच जोर नाही, मग सामनामधून किरीट सोमय्याची दखल का घेता? असा सवालही त्यांनी केला आहे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेले घोटाळे कोल्हापूरमध्ये जाऊन उघडकीस आणणार असल्याची घोषणा करत किरीट सोमय्यांनी कोल्हापूर दौऱ्याचा निर्धार केला आहे. किरीट सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गडहिंग्लज साखर कारखान्यात 127 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. कोल्हापुरात जाऊन पाहणी करण्याचा सोमय्यांनी चंगच बांधलाय. पण पुढे महाविकास आघाडीने देखील आक्रमक पवित्रा घेतला आणि सोमय्यांना कोल्हापुरात न जाता कराडमध्येच थांबावं लागलं. पण यादरम्यान कोल्हापुरातील राष्ट्रवादीचे समर्थक आणि मुश्रीफांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. आता मंगळवार आणि बुधवारी पुन्हा एकदा सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर असतील.

किरीट सोमय्यांचे प्रत्युत्तर

किरीट सोमय्यांची कोल्हापूर दौऱ्यात अडवणूक करणं गैर आहे, असं शरद पवार स्वत: बोलतात. सरकारला सांगावे लागते की दौरा अडवला याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाला नव्हती. हे अत्यंत चुकीचं असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला. किरीट सोमय्यांचा दौरा सरकारला का अडवावा लागतो. हे सगळं सरकार का करतंय? असे एक ना अनेक सवाल किरीट सोमय्यांनी यावेळी उपस्थित केले.

उद्यापासून मुंबई प्रभादेवी येथून सोमय्या आपल्या कोल्हापूर दौऱ्याला प्रारंभ करतील. या दौऱ्यात कोल्हापूरमधील मुरगुड, कागल, इथे भेट देण्याचा सोमय्यांचा मानस आहे. कोल्हापूर पोलीस स्टेशनला हसन मुश्रीफ यांच्याविरोधात तिसऱ्या घोटाळ्याविरोधात सोमय्या तक्रार दाखल करणार आहे. यावेळी सोमय्यांबरोबर भाजप नेत्यांची फौज असणार आहे. कोल्हापूर दौऱ्यामध्ये विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, अशिष शेलार आणि गोपाळ शेट्टी सोमय्यांबरोबर असतील.

रोखठोकमध्ये नेमकं काय?

महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने ताळतंत्र सोडला आहे. माजी खासदार किरीट सोमय्या रोज सकाळी उठून मंत्र्यांवर नवा आरोप करतात व त्या मंत्र्यांच्या मतदारसंघात दौरे काढतात. सरकारने त्यांचे दौरे रोखू नयेत असे मला वाटते. चंद्रकांत पाटील यांची वेगळीच तऱ्हा आहे. पंतप्रधान मोदी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी ‘कोव्हॅक्सिन’ लस घेतली, पण कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिली नाही, तरीही मोदी वॉशिंग्टनला उतरले! एकंदरीत सगळीच गंमत आहे, असा चिमटा राऊत यांनी काढला आहे.

(BJP Leader Kirit Somaiya Challenge mahavikas Aaghadi Over kolhapur Visit)

हे ही वाचा :

सोमय्यांना इशारा देत सतेज पाटलांचा हसन मुश्रीफांना फुल सपोर्ट, म्हणाले, ‘बदनामीचा कट हाणून पाडू’

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI