कृष्णा हेगडे यांचा भाजपला रामराम, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘शिवबंधन’ बांधलं

कृष्णा हेगडे हे गेल्या काही काळापासून भाजपमध्ये होते. त्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जात शिवसेनेते प्रवेश केलाय.

कृष्णा हेगडे यांचा भाजपला रामराम, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'शिवबंधन' बांधलं
Follow us
| Updated on: Feb 05, 2021 | 8:26 PM

मुंबई : मुंबईमध्ये भाजपला मोठा झटका बसलाय. कारण, माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केलाय. कृष्णा हेगडे हे गेल्या काही काळापासून भाजपमध्ये होते. पण तिथे ते अस्वस्थ असल्याचं बोललं जात होतं. अखेर त्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जात शिवसेनेते प्रवेश केलाय. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी बलात्काराची तक्रार दिल्यानंतर कृष्णा हेगडे यांनी मुंबई पोलिसांना पत्र लिहून रेणू शर्मावर कारवाईची मागणी केली होती. रेणू शर्मा यांनी आपल्यालाही ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचं हेगडे यांनी सांगितल्यानंतर ते चर्चेत आले होते.(BJP leader Krishna Hegde joins Shiv Sena)

कृष्णा हेगडे हे मुळचे काँग्रेसचे होते. त्यांनी मुंबईतील विलेपार्ले मतदारसंघातून निवडणूकही जिंकली होती. सध्या हा मतदारसंघ भाजपकडे आहे. पराग अळवणी हे भाजपचे तिथले आमदार आहेत. विलेपार्लेमध्ये कृष्णा हेगडे यांना वाव मिळत नव्हता आणि ते गेल्या काही काळापासून अस्वस्थ असल्याचंही बोललं जात होतं. त्यामुळे ते भाजपला राम राम ठोकतील अशी शक्यताही वर्तवली जात होती. शुक्रवारी अखेर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जात शिवसेनेत प्रवेश करत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हाती शिवबंधन बांधलं आहे.

निरुपमांवर आरोप करत भाजपमध्ये प्रवेश

कृष्णा हेगडे हे मूळचे काँग्रेसचे आहेत. त्यांनी विलेपार्ले मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. मुंबई महापालिकेच्या मागील निवडणुकीदरम्यान त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये प्रवेश करताना हेगडे यांनी तत्कालिन मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर आरोप करत भाजपचं कमळ हाती घेतलं होतं. निरुपम हे निष्ठावंतांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

2009 मध्ये विलेपार्लेतून आमदार

2009 मध्ये हेगडे यांनी काँग्रेसच्या तिकीटावर विलेपार्ले मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. पण 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पराग अळवणी यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर तीन वर्षांनी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हेगडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाला कंटावून आपण भाजपमध्ये जात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

शिवसेनेचा विलेपार्लेत भाजप आणि मनसेला डबल धक्का

विलेपार्ले मतदारसंघाचे माजी आमदार आणि भाजप नेते कृष्णा घेगडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्याचबरोबर 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील मनसेच्या उमेदवार जुईली शेंडे यांनीही हाती शिवबंधून बांधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी शिवबंधन बांधलं. यावेळी परिवहनमंत्री अनिल परब, युवासेना सचिव वरुण सरदेसाई उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

रिलेशनशिपसाठी रेणू शर्माचा माझ्यावरही दबाव, कॉल, मेसेज करायची, आता माजी आमदाराचा आरोप 

धनंजय मुंडे माझे मित्र नाहीत; राजकीय मदतीचा प्रश्नच नाही: कृष्णा हेगडे

BJP leader Krishna Hegde joins Shiv Sena

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.