उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्रिपदावर राहायचं नाही, त्यामुळे मध्यावधी निश्चित : नारायण राणे

कोकणी माणसासाठी उद्धव ठाकरे यांचे योगदान काय? असा प्रश्नही नारायण राणेंनी उपस्थितीत (Narayan Rane criticizes Uddhav Thackeray) केला.

Narayan Rane criticizes Uddhav Thackeray, उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्रिपदावर राहायचं नाही, त्यामुळे मध्यावधी निश्चित : नारायण राणे

सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दोन दिवसीय कोकण दौरा आज (18 फेब्रुवारी) पूर्ण (Narayan Rane criticizes Uddhav Thackeray)  झाला. “उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यात कोकणाला काहीही मिळाले नाही. त्यांचा सर्व दौरा हेलिकॉप्टरने होता. ते रत्नागिरीतील नाणार प्रकल्पासंदर्भात एकही शब्द बोलले नाहीत,” अशी टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली.

“उद्धव ठाकरेंचे कोकणाच्या विकासात कोणतंही योगदान नाही. मुख्यमंत्र्यांना कोकणाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासाबद्दल ज्ञान नाही. शासकीय अधिकारी फक्त मुख्यमंत्र्यांना फिरवण्याचं काम करतात. त्यांना राज्याविषयी काहीही ज्ञान नाही. मी मुख्यमंत्री झालो, फक्त एवढंच दाखवण्यासाठी उद्धव ठाकरे कोकणात आले होते,” असेही राणे म्हणाले.

“मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार पेलवत नाही. मध्यावधी निवडणुका होतील. कारण मुख्यमंत्र्यांना पदावर राहायच नाही. शिवसेनेत असंतोष आहे हे मी सांगायला नको. यापूर्वीही मारामारी केली आहे. सत्तेसाठी लाचारी केली हे शिवसैनिकांना आवडलेलं नाही,” असेही राणे यावेळी (Narayan Rane criticizes Uddhav Thackeray) म्हणाले.

“सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनासाठी ओळखला जातो. मात्र या जिल्ह्याला किती निधी मिळाला काहीही सांगितले नाही. कोणत्याही योजनेला मुख्यमंत्र्यांनी पैसे दिले नाहीत. कोकणासाठी कोणतीही आर्थिक तरतूद नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तोंडाला पाने पुसून मुख्यमंत्री परत गेले,” असेही नारायण राणे म्हणाले.

“कोकणात मच्छिमारांची उपासमार होते आहे. त्यावर ते एकही शब्द बोलले नाहीत. कोकणाचा नवा महाराष्ट्र घडवू या असे मुख्यमंत्री म्हणाले. पण कोकण हे महाराष्ट्रातच आहे,” अशीही टीका नारायण राणेंनी केली.

“मच्छिमारांची उपासमार होतं आहे, त्यावर ते एक शब्द बोलले नाहीत. वृत्तपत्रांनी दोन दिवस नाहक प्रसिद्धी दिली. माझा विरोधाला विरोध नाही. मी कोकणी माणसासाठी बोलतो आहे. कोकणी माणसासाठी उद्धव ठाकरे यांचे योगदान काय? असा प्रश्नही नारायण राणेंनी उपस्थितीत (Narayan Rane criticizes Uddhav Thackeray) केला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *