दुसऱ्यांची पिल्लं वाईट, मग त्यांनी ‘श्रावणबाळ’ जन्माला घातला आहे का? नितेश राणेंचं टीकास्त्र

मग कळेल श्रावणबाळ काय दिवे लावतो ते!," अशी टीका नितेश राणे यांनी अधिकृत ट्विटरवरुन केली. (BJP leader Nitesh Rane On CM Uddhav thackeray criticism)

दुसऱ्यांची पिल्लं वाईट, मग त्यांनी 'श्रावणबाळ' जन्माला घातला आहे का? नितेश राणेंचं टीकास्त्र

मुंबई : दुसऱ्यांची पिल्लं वाईट…मग त्यांनी काय DINO च्या खुशित नशा करुन मुलींवर अत्याचार करणारा “श्रावणबाळ” जन्माला घातला आहे का? अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली. राज्यात काहीजणांना माणसांची इंजेक्शन्स लागू पडत नाहीत. त्यांना गुराढोरांची इंजेक्शन्स लागतात. गेल्या काही दिवसांपासून एक बेडूक आणि त्याची दोन पिल्लं शिवसेनेविरोधात ओरडत फिरत आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून केली. यावर नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं. (BJP leader Nitesh Rane On CM Uddhav thackeray criticism)

“दुसऱ्यांची ‘पिल्ल’ वाईट.. मग यांनी काय त्या DINO च्या खुशित नशा करुन मुलींवर अत्याचार करणारा “श्रावणबाळ” जन्माला घातला आहे का? इतकी खुम खुमी आहे ना मग ती Disha Salain ची केस मुंबई पोलिसांवर कुठलाही दबाव न टाकता निपक्षपाती चौकशी करुन द्या.. मग कळेल श्रावणबाळ काय दिवे लावतो ते!,” अशी टीका नितेश राणे यांनी अधिकृत ट्विटरवरुन केली.

“बिहारच्या अगोदरच पक्षप्रमुखानी “Vaccine” घेतलेली दिसते. जास्तच हवा भरलेली आज, किती आव, ‘टाचणी’ तैयार आहे.. फक्त योग्य वेळ येऊन द्या,” अशी टीका नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर केली.

हेही वाचा – ‘देवेंद्र फडणवीसांनी लवकर बरे व्हावे; आम्हाला लढण्यासाठी समोर तगडा पैलवान पाहिजे’

“गेल्या काही दिवसांपासून एक बेडूक आणि त्याची दोन पोरं डराव डराव करत आहेत. आपण गोष्टीत बेडकीने बैल पाहिला हे ऐकले असेल. पण या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला. त्यानंतर ही पिल्ले आपल्या वडिलांकडे गेली. तेव्हा मोठ्या बेडकाने ओरडायचा प्रयत्न केला. पण त्याचा आवाज आता चिरका झाला,” असे उद्धव ठाकरे म्हणाले

“राज्यात काहीजणांना माणसांची इंजेक्शन्स लागू पडत नाहीत. त्यांना गुराढोरांची इंजेक्शन्स लागतात. गेल्या काही दिवसांपासून एक बेडूक आणि त्याची दोन पिल्लं शिवसेनेविरोधात ओरडत फिरत आहेत,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

“काही लोकांना सत्तेचे स्वप्न पडत आहेत. अनेक दिवसांपासून सत्ता पाडण्याचं ऐकत आहे. हिंमत असेल तर सरकार पाडा, आम्ही तुमच्या सारखे गुळाच्या ढेपेला चिटकलेले मुंगळे नाहीत. वाटेला जाल तर काय ते दाखवून देऊ,” असं थेट आव्हानच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विरोधकांना दिलं. (BJP leader Nitesh Rane On CM Uddhav thackeray criticism)

संबंधित बातम्या : 

शिवसेनेचं हिंदुत्व घंटा वाजवणारं हिंदुत्व नाही, मग मित्राच्या पाठीत खंजीर खुपसणारं आहे का? : सुधीर मुनगंटीवार

मुंबईची पाकिस्तानशी तुलना; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कंगनाला नाव न घेता झापले!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI