VIDEO | …तोपर्यंत ना गळ्यात हार घालून घेणार, ना मला कुणी फेटा बांधायचा : पंकजा मुंडे

जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही, पंकजा मुंडे गळ्यामध्ये हार घालून घेणार नाही. आणि जोपर्यंत ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा विषय पूर्ण होत नाही, तोपर्यंत कोणी माझ्या डोक्यावर फेटा बांधायचा नाही" असं पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना निक्षून सांगितलं.

VIDEO | ...तोपर्यंत ना गळ्यात हार घालून घेणार, ना मला कुणी फेटा बांधायचा : पंकजा मुंडे
महामार्गाच्या कामावरून पुन्हा पत्रप्रपंच
Follow us
| Updated on: Aug 17, 2021 | 7:36 AM

बीड : जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही, तोपर्यंत गळ्यात हार घालणार नाही आणि ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही, तोपर्यंत मला कुणी फेटा बांधायचा नाही, अशी घोषणाच भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केली आहे. बीडमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पंकजा मुंडेंनी आपल्या भाषणादरम्यान ही मोठी घोषणा केली आहे. या बैठकीला पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी होती.

पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?

“मी ही लढाई लढायचं ठरवलं आहे. रोज-रोज-रोज या गोष्टींना… आपण बाजूला केलंच पाहिजे. बीड जिल्ह्याने एक सुंदर, वेगळं उदाहरण घालून दिलं पाहिजे. मी सांगते आज, कोणीही मला इथून यापुढे हार घालायचा नाही, जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही, पंकजा मुंडे गळ्यामध्ये हार घालून घेणार नाही. आणि जोपर्यंत ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा विषय पूर्ण होत नाही, तोपर्यंत कोणी माझ्या डोक्यावर फेटा बांधायचा नाही” असं पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना निक्षून सांगितलं.

“अरे हेच तर पाहिजे, ज्याला आज खुर्चीवर बसायचंय, त्याला हेच पाहिजे. आपसात भांडा आणि मरा, छत्रपती शिवाजी महाराजांनी हे नाही केलं. सोशल इंजिनिअरिंग करणारा जगातील पहिला माणूस कोण असेल तर ते छत्रपती शिवराय आहेत, या महाराष्ट्रातले. मुंडे साहेबांना विचारलं तुमचं राजकीय गुरु कोण, तर ते म्हणायचे मी राजकारण करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य कारभार डोळ्यासमोर ठेवतो.” असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

Video : चुकीला माफी नाही, पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्याच्या पाठीवर दणका! नेमकं कारण काय?

Video : जेवढ्या मोठ्या उंचीची मी, तेवढी लायकी ठेवा स्वत:ची, पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना झाप झाप झापलं!

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.