Video : जेवढ्या मोठ्या उंचीची मी, तेवढी लायकी ठेवा स्वत:ची, पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना झाप झाप झापलं!

राडेबाज कार्यकर्त्यांवर पंकजा मुंडे चांगल्याच भडकलेल्या पाहायला मिळाल्या.  अंगार-भंगार घोषणा काय देताय... हे वागणं शोभतं का तुम्हाला... असा प्रकार मला चालणार नाही, परत येऊ नका मला भेटायला, अशा शब्दात त्यांनी राडेबाज कार्यकर्त्यांना झापलं.

Video : जेवढ्या मोठ्या उंचीची मी, तेवढी लायकी ठेवा स्वत:ची, पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना झाप झाप झापलं!
पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर भडकल्या!
Follow us
| Updated on: Aug 16, 2021 | 12:30 PM

परळी : भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांची जनआशीर्वाद यात्रा (Jan Ashirwad yatra) आजपासून (16 ऑगस्ट) सुरु होत झाली. मात्र ही यात्रा सुरु होण्याआधीच परळीत राडा पाहायला मिळाला. भागवत कराड परळीत दाखल होताच मुंडे समर्थकांनी पंकडा आणि प्रितम यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. या साऱ्या प्रकारावर पंकजा मुंडे चांगल्याच भडकलेल्या पाहायला मिळाल्या.  अंगार-भंगार घोषणा काय देताय… हे वागणं शोभतं का तुम्हाला… असा प्रकार मला चालणार नाही, परत येऊ नका मला भेटायला, अशा शब्दात त्यांनी राडेबाज कार्यकर्त्यांना झापलं.

आज सकाळी साडे नऊच्या सुमारास भागवत कराड पंकजा मुंडे यांच्या घरी पोहोचले. पंकजा मुंडे यांनी भागवत कराड यांचं स्वागत केलं. परंतु पंकजा मुंडे यांच्या घरासमोर मुंडे समर्थकांनी घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांनी गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. भागवत कराड दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करुन आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.

अंगार-भंगार घोषणा काय देताय, पंकजा संतापल्या

भागवत कराड यांच्यासमोर राडा करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पंकजा संतापल्या. अंगार भंगार घोषणा काय देताय…. तुमच्यावर असे संस्कार आहे का? दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम सुरु आहे का?… असं वागणं मला चालणार नाही… असंच जर वर्तन असेल तर परत मला भेटायला येऊ नका… जेवढ्या उंचीच आहे मी तेवढी लायकी ठेवा, नाहीतर येऊ नका परत माझ्याकडे, असं म्हणत पंकजा संपातून गाडीच्या दिशेने निघून गेल्या.

भागवत कराड यांच्यासमोर मुंडे समर्थकांची घोषणाबाजी

सकाळी 9 च्या आसपास केंद्रीय मंत्री भागवत कराड जन आशीर्वाद यात्रेसाठी परळीत दाखल झाले. साडे नऊच्या आसपास ते पंकजा मुंडे यांच्या घरी पोहोचले. यावेळी त्यांना मुंडे समर्थकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. पंकजा यांच्या घरासमोर गोपीनाथ मुंडे समर्थकांनी घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांनी गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. भागवत कराड दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करुन आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. यावरुन पंकजा मुंडे यांच्या समर्थकांमध्ये रोष कायम असल्याचं दिसून येत आहे.

6 ते 21 ऑगस्टदरम्यान कराडांची यात्रा

भागवत कराड यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या यात्रेची घोषणा केली आहे. “भव्य जनआशिर्वाद यात्रा… दि. 16 ते 21 ऑगस्ट 2021 , मुंडे साहेबांचा आशिर्वाद व जनतेचा पाठिंब्या मुळेच आज इथवर पोहोचलो, येत आहे जनतेचा आशिर्वाद घ्यायला”, असं ट्वीट भागवत कराड यांनी केलंय. त्यावेळी त्यांनी भाजपचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या फोटोंचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. त्यात गोपीनाथ मुंडे यांना त्यांनी ‘आमचं काळीज’ असं म्हटलंय. भागवत कराड आज केंद्रीय राज्यमंत्रीपदी विराजमान झाले असतील तर त्यामागे गोपीनाथ मुंडे यांची पुण्याई असल्याचं लोक म्हणतात.

हे ही वाचा :

भागवत कराड पंकजाच्या घरी दाखल, कार्यकर्त्यांची पंकजा-प्रितमच्या समर्थनार्थ घोषणाबाजी, यात्रेआधीच राडा

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.