शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक जण संपर्कात, राज्यात लवकरच भाजपची सत्ता येणार : शिवाजी कर्डिले

देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या बैठकीची बातमी समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं असताना शिवाजी कर्डिले (BJP Leader Shivaji Kardile) यांनी राज्यात भाजप सत्ता येणार असल्याचा दावा केला आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक जण संपर्कात, राज्यात लवकरच भाजपची सत्ता येणार : शिवाजी कर्डिले

अहमदनगर : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील अनेक जण आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे राज्यात थोड्या दिवसात भाजपचे सरकार येणार आहे, असा दावा भाजप नेते आणि माजी मंत्री शिवाजी कर्डिले (BJP Leader Shivaji Kardile) यांनी केला आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यात शनिवारी (26 सप्टेंबर) मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीची बातमी समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं असताना शिवाजी कर्डिले यांनी राज्यात भाजप सत्ता येणार असल्याचा दावा केला आहे.

अहमदनगरच्या शासकीय विश्रामगृहावर शिवाजी कर्डिले (BJP Leader Shivaji Kardile), महापौर बाबासाहेब वाकळे आणि भाजपचे शहराध्यक्ष भैय्या गंधे यांच्यात आज (27 सप्टेंबर) बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

“शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेज जण आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे काही दिवसांनी राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येणार आहे. भाजपची केंद्रात सत्ता आहेच, पण आता राज्यातही सत्ता येईल. राज्यात भाजपची सत्ता येणार असल्यामुळेच ते आमच्या संपर्कात आहेत. याशिवाय आगामी काळात नगरमधील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे बरेच नगरसेवक आमच्यासोबत येतील”, अशी प्रतिक्रिया शिवाजी कर्डिले यांनी दिली.

भाजप नगरसेवक मनोज कोतकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरही कर्डिले यांनी प्रतिक्रिया दिली. “कोतकर स्वत:च्या स्वार्थ आणि पदासाठी राष्ट्रवादीत गेले असतील. त्याबाबत आमचे शहराध्यक्ष आणि महापौरांनी खुलासा केला आहे. त्यांच्यावर काय कारवाई करायची त्याबाबतचा निर्णय आमचे शहराध्यक्ष घेतील”, असं कर्डीले यांनी सांगितलं.

नगरमध्ये राजकीय घडामोडींना वेग

अहमदनगर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीअगोदर नगरमध्ये राजकीय भूकंप घडला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे उमेदवार मनोज कोतकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

विशेष म्हणजे भाजपवासी असतानाही मनोज कोतकर हे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. त्यांच्या प्रवेशाने राजकीय भूकंप आल्याची चर्चा नगरच्या राजकारणात रंगली. अखेर शिवसेनेच्या पाठींब्यामुळे मनोज कोतकर यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी वर्णी लागली.

मात्र, स्थायी समितीच्या सभापती निवडणुकीनंतरही नगरमधील राजकीय घडामोडी सुरुच आहेत. नगरच्या शासकीय विश्रामगृहावर शिवाजी कर्डिले, महापौर बाबासाहेब वाकळे आणि भाजपचे शहराध्यक्ष भैय्या गंधे यांच्यात आज बैठक झाली. पुढच्या काही महिन्यांमध्ये महापौरपदाची निवडणूक आहे. त्यामुळे आगामी काळात अनेक राजकीय उलथापालथ पाहायला मिळणार असल्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे.

संबंधित बातम्या :

अहमदनगरमध्ये राजकीय भूकंप, सभापतीपदाच्या रिंगणातील भाजप नगरसेवक राष्ट्रवादीत

शिवसेनेने शब्द पाळला, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *