कोण आहेत नरेंद्र मोदी यांचे 3 सारथी? महाराष्ट्रातल्या बड्या नेत्याचं नाव, लोकसभा 2024 साठी मोठ्या हालचाली, जे पी नड्डांची रणनीती काय?

Loksabha Elections 2024 | आगामी लोकसभा निवडणुकांकरिता भाजपने तगडी रणनीती आखली आहे. प्रत्येक मतदारसंघातील मतदार आणि उमेदवारांची पारख करूनच पुढचे डावपेच खेळले जातील. तीन मोठ्या नेत्यांवर ही जबाबदारी देण्यात आली आहे. नरेंद्र मोदी यांचे ते जणू सारथीच असतील.

कोण आहेत नरेंद्र मोदी यांचे 3 सारथी? महाराष्ट्रातल्या बड्या नेत्याचं नाव, लोकसभा 2024 साठी मोठ्या हालचाली, जे पी नड्डांची रणनीती काय?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Mar 11, 2023 | 9:51 AM

नवी दिल्ली | नेहमीच इलेक्शन (Election) मोडवर असलेल्या भाजपने मिशन लोकसभा 2024 साठी आता आणखी वेगानं आणि नियोजनपूर्वक पाऊलं उचलायला सुरुवात केली आहे. देशात एकिकडे विरोधकांची एकजूट पहायला मिळतेय तर दुसरीकडे भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांकडून निवडणुकीसाठी काटेकोर नियोजन सुरु आहे. 2019 मध्ये भाजपाने लोकसभेच्या 303 जागा जिंकल्या होत्या. मात्र आता सर्वात मोठं टार्गेट ठेवण्यात आलंय. यंदा 400 पेक्षा जास्त जागा निवडून आणण्याचं भाजपचं उद्दिष्ट आहे. हा प्लॅन यशस्वी करण्यासाठी भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी तीन सदस्यांची टीम तयार केली आहे. निवडणुकीतील उमेदवारांसाठी हे तिघे अत्यंत बारकाईने रणनीती आखतील. प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक नागरिकांची माहिती घेत अत्यंत पारखून उमेदवाराची निवड करण्याचं काम हे तिघे करतील. उमेदवारांना शॉर्ट लिस्ट करतील. स्थानिक भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधतील. विशेष म्हणजे यात महाराष्ट्रातील एक बड्या नेत्याचं नाव आहे.

कोण आहेत तीन सारथी?

2024 मध्ये पुन्हा एकदा भाजपाला बहुमतात आणत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदावर विराजमान करायचं हे भाजपचं उद्दिष्ट आहे. मोदींना यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्षांनी त्यांच्या मदतीला तीन भाजप नेते अर्थात सारथी दिले आहेत. हे तिघेही भाजपचे महासचिव आहेत. यात महाराष्ट्रातील विनोद तावडे यांच्यासह सुनील बंसल आणि तरुण चुग या दोघांचा समावेश आहे. यानिमित्ताने विनोद तावडेंच्या पक्षसंघटनात्मक क्षमता नव्याने पारखल्या जातील.

विनोद तावडेंना नवी संधी

महाराष्ट्रात एकेकाळी देवेंद्र फडणवीस यांचे स्पर्धक म्हणून विनोद तावडे यांची ओळख होती. २०१९ मध्ये फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांना साईडलाइनच कऱण्यात आलं होतं. मात्र यंदा लोकसभा निवडणुकांसाठी पुन्हा एकदा विनोद तावडे यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. २०१९ मध्ये अगदी शेवटच्या क्षणाला विनोद तावडे यांना तिकिट नाकारण्यात आलं. मात्र पक्षनिष्ठ राहून त्यांनी उमेदवार सुनिव राणे यांचा प्रचार केला. याच निष्ठेचं फळ म्हणून केंद्रातील राजकारणात थेट जे पी नड्डा यांच्या टीममध्ये त्यांना राष्ट्रीय सचिव पद देण्यात आलं. २०२१ मध्ये त्यांना महासचिव पद करण्यात आलंय. आता तर मिशन २०२४ साठी विनोद तावडे यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

अन्य दोघे कोण?

मोदींचे सारथी म्हणून मोठी जबाबदारी देण्यात आलेल्या अन्य दोघांमध्ये सुनील बंसल आणि तरुण चुग यांची नावं आहेत. लोकसभा २०१४ मध्ये सुनील बंसल यांनी अमित शाह यांच्यासोबत उत्तर भारतात मोठं काम केलं होतं. त्यानंतरही इतर विधानसभा निवडणुकांमध्ये सुनील बंसल यांनी भाजप संघटन वाढवण्यासाठी जबाबदार भूमिका बजावली. सुनिल बंसल हे मूळ राजस्थानचे असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर कार्यकर्ते आहेत. तर विनोद तावडे आणि सुनील बंसल यांच्या प्रमाणेच एबीव्हीपीद्वारे भाजपात आलेले तिसरे नेते म्हणजे तरुण चूग. मूळ अमृतसरचे तरुण चूग सध्या तेलंगणा भाजपात सक्रिय आहेत. लॉजिस्टिक्समध्ये अत्यंत परफेक्ट समजले जाणारे तरुण चूग भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.