AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार-अशोक चव्हाण चौकशांना सामोरे गेले, शेंबड्या मुलांसारख्या शपथा खाऊ नका : नितेश राणे

उद्या तोंड काळं होण्यापेक्षा आजच राजीनामा द्या आणि चौकशीला सामोरं जा" अशा शब्दात नितेश राणेंनी निशाणा साधला. (Nitesh Rane slams Anil Parab )

अजित पवार-अशोक चव्हाण चौकशांना सामोरे गेले, शेंबड्या मुलांसारख्या शपथा खाऊ नका : नितेश राणे
अनिल परब, नितेश राणे
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Apr 08, 2021 | 11:53 AM
Share

सिंधुदुर्ग : “वकील आहात, लहान शेंबड्या मुलांसारख्या शपथा खाऊ नयेत” अशा शब्दात भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी परिवहन मंत्री अॅड. अनिल परब (Anil Parab) यांना फटकारलं. “जो नियम अनिल देशमुख, अजित पवार आणि अशोक चव्हाण यांना लागू झाला होता, तोच आता अनिल परब यांना लागतो” असंही नितेश राणे म्हणाले. (BJP MLA Nitesh Rane slams Minister Adv Anil Parab over allegations by Sachin Vaze)

“गृह खातं अनिल परब चालवतात यावर शिक्कामोर्तब” 

“विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी विचारलं होतं की गृह खाते अनिल देशमुख चालवतात की अनिल परब, यावर काल शिक्कामोर्तब झालं आहे. वकील असलेल्या माणसाने अशा प्रकारच्या शपथा खायच्या असतात का? तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जायला हवं” अशी मागणी नितेश राणे यांनी केली.

“शेंबड्या मुलांसारख्या शपथा खाऊ नका”

“जो नियम अनिल देशमुख यांना लागतो, जो नियम सिंचन घोटाळ्याच्या वेळी अजित पवारांना लागला, जो नियम आदर्श घोटाळ्याच्या वेळी अशोक चव्हाण यांना लागू होतो, तोच अनिल परब यांना लागतो. तेव्हा त्यांनी शपथा खाल्ल्या नव्हत्या. ते चौकशीला सामोरे गेले. लहान शेंबड्या मुलांसारख्या शपथा खाऊ नका” असं नितेश राणे म्हणाले.

“सचिन वाझे आणि अनिल परब यांच्यामधले संवाद हे एनआयकडे आहेत. टेलिग्रामचे चॅट पण त्यांच्याकडे आहेत. उद्या तोंड काळं होण्यापेक्षा आजच राजीनामा द्या आणि चौकशीला सामोरं जा” अशा शब्दात नितेश राणेंनी निशाणा साधला.

नितेश राणे यांचे ट्वीट

“मी विचार करत होतो… मला शहरातली सर्वात एलिजिबल आणि उच्चशिक्षित बॅचलरकडून अजूनही मानहानीची नोटीस येणार का? आतुरतेने वाट पाहतोय. वकील साहेबांची तर काल लागली… आता नोटीस कोण बनवणार?” असा उपरोधिक सवाल नितेश राणे यांनी ट्विटरवरुन विचारला आहे.

नितेश राणेंनी कालही ट्विटरवरुन निशाणा साधला होता. “ओ परिवार मंत्री.. शपथ काय घेता.. शेंबूड पुसा.. राजीनामा द्या आणि चौकशीला सामोरे जा.. पुरावे तयार आहेत.. आता वस्त्रहरण अटळ आहे!!” असे ट्वीट नितेश राणेंनी केले होते. (BJP MLA Nitesh Rane slams Minister Adv Anil Parab over allegations by Sachin Vaze)

अनिल परब यांच्यावर आरोप काय?

निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी एनआयए कोर्टात एक पत्र देऊन परब यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. “अनिल परब यांनी आपल्याला जुलै-ऑगस्ट 2020 मध्ये बोलावून घेतलं होतं. यावेळी त्यांनी सैफी बुऱ्हाणी अपलिफ्टमेंट ट्रस्ट (एसबीयूटी) कडून 50 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते. या एसबीयूटीची चौकशी सुरू होती. आधी त्यांनी मला या एसबीयूटी प्रकरणाची चौकशी करून ट्रस्टींसोबत चर्चा करायला सांगितलं होतं. नंतर केस बंद करण्याच्या नावाखाली एसबीयूटीकडून 50 लाख रुपये वसूल करण्यास सांगितले. त्याला मी नकार दिला. कारण एसबीयूटीमध्ये मी कुणालाच ओळखत नव्हतो. तसेच चौकशीशी माझा काही संबंधही नव्हता” असं वाझेंनी या पत्रात म्हटलं आहे.

संबंधित बातम्या:

वकील साहबकी लग गयी, आता ‘एलिजीबल बॅचलर’तर्फे मानहानीची नोटीस कोण पाठवणार? : नितेश राणे

अनिल परबांना दोन मुलींची शपथ का घ्यावी लागली?, बाळासाहेबांचीही का घ्यावी लागली?; वाचा सविस्तर प्रकरण

Sachin Vaze Case : बाळासाहेबांची आणि माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगतो, माझ्यावरील आरोप खोटे- अनिल परब

(BJP MLA Nitesh Rane slams Minister Adv Anil Parab over allegations by Sachin Vaze)

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ