AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महायुतीमधल्या फोडाफोडीच्या आरोपावर भाजप आमदाराचं संजय शिरसाटांना उत्तर, एकनाथ शिंदेंकडे तक्रार….

"एक लक्षात ठेवा अकॅशनला Reaction असेल याबाबत वरिष्ठनी काळजी घ्यावी, बरं प्रचार करायचा की फोडा फोडी करावी हे ही ठरवा” असं संजय शिरसाट आज म्हणाले. त्यावर आता भाजप आमदाराने उत्तर दिलं आहे.

महायुतीमधल्या फोडाफोडीच्या आरोपावर भाजप आमदाराचं संजय शिरसाटांना उत्तर, एकनाथ शिंदेंकडे तक्रार....
Sanjay Shirsat
| Updated on: Nov 25, 2025 | 3:40 PM
Share

“महायुतीमधल्या पक्षातील कार्यकर्त्यांचा आपसात होणारा पक्ष बदल या स्थानिक पातळीवरच्या घटना आहेत आणि याला एवढे मोठे स्वरूप द्यायची काही गरज नाही.माझ्या मते ही बाब एकनाथ शिंदेंकडे तक्रार करण्यायोग्य नाही” असं विधान परिषदेतील भाजपचे आमदार संजय केनेकर यांनी म्हटलं आहे. आजच “शिवसेना, भाजप, एनसीपीमध्ये अलिखित करार झालाय. पक्षांचे लोक आप आपसात घ्यायचे नाहीत तरी संभाजी नगरात पैशांची मस्ती काहींना आलीय. त्या जीवावर फोडाफोडी केली जातेय. त्या बाबत अहवाल आम्ही शिंदे साहेबांना देणार आहोत” असं संजय शिरसाट म्हणाले. “आम्ही आमच्यात या म्हणून कोणाला घरातून जाऊन आणले नाही, किंवा कुणाला निमंत्रण दिले नाही. आपले काही लोक महायुतीत दुसरीकडे जात असतील आणि तेच महायुतीच्या पक्षाकडे येत असतील तर दुसरीकडे गेल्यापेक्षा ते बरे आहे” असं संजय केनेकर म्हणाले.

“काँग्रेस किंवा उद्धव ठाकरेंकडे महायुतीतील लोक जाण्यापेक्षा महायुती हा आपला परिवार आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे आपल्याकडे काम करणारी मंडळी महायुतीत राहिली पाहिजे. आपला चांगला माणूस विरोधकांच्या नादी लागून त्यांच्याकडे जाऊ नये अशी आपली भूमिका असते” असं संजय केनेकर यांनी सांगितलं. “कोणी महायुतीतून जात असेल तर त्यांना आम्ही समजावून सांगतो की,त्यांनी महायुतीत राहावे. संजय शिरसाट आणि आमचा चांगला समन्वय आहे आणि खालच्या कार्यकर्त्यांमुळे आमच्यामध्ये काही वैमनस्य होईल असे मला वाटत नाही” असं संजय केनेकर म्हणाले.

आम्ही अजिबात कोणाला फोडलेलं नाही

“अशा पक्षप्रवेशामुळे महायुतीला काही डॅमेज होईल अशी भावना आमच्या महायुतीत कोणत्याही नेत्यांमध्ये नाही. आम्ही अजिबात कोणाला फोडलेलं नाही. निमंत्रण दिले नाही, कोणाला घरात ओढून आणलेलं नाही किंवा कोणाला बळजबरी उचलून नेले नाही” असं संजय केनेकर यांचं म्हणणं आहे. “बहुतेक राजेंद्र जंजाळ काही नाराज नाहीत. त्यांचं शिरसाट यांच्यासोबत खूप चांगलं सुरु असेल. त्यांच्यामध्ये खूप एकोपा होता आणि एक नाण्याच्या त्या दोन बाजू होत्या” असा टोमणा मारला.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.