Mahayuti : ‘पैशांची मस्ती आलीय’, महायुतीत राड्याला निमंत्रण देणारं शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
Mahayuti : कुणाल कामराने RSS लिहिलेलं टी-शर्ट घातलं. त्यावरुन वाद सुरु आहे. "आता याचा अर्थ काय घ्यायचा ते त्या पक्षाचे नेते ठरवतील. गेल्या वेळी मोदी साहेब, शिंदे साहेबांवर टीका केली, आम्ही उत्तर दिले. आता हिम्मत वाढली संघावर टीका करतोय याचे उत्तर भाजपने द्यावे"

“शिवसेना, भाजप, एनसीपीमध्ये अलिखित करार झालाय. पक्षांचे लोक आप आपसात घ्यायचे नाहीत तरी संभाजी नगरात पैशांची मस्ती काहींना आलीय. त्या जीवावर फोडाफोडी केली जातेय. त्या बाबत अहवाल आम्ही शिंदे साहेबांना देणार आहोत. याचा परिणाम सगळ्यांना भोगावा लागेल, वर्चस्व सिद्ध करायला आम्ही पाऊल उचलले तर मग वाईट वाटून घेऊ नाका, संयम पाळला आहे, मात्र जास्त काळ टिकणार नाही. संयमाची मर्यादा असते” असा इशारा मंत्री संजय शिरसाट यांनी दिला. “नाराजी वाढतेय संभ्रम निर्माण होतोय. फुलंब्री, गंगापूर, वैजापूर सगळीकडे असे सुरू असेल तर महायुती म्हणून काय आपला रोल आहे, हे थांबवा एकाचा परिणाम दुसऱ्या निवडणुकीवर होईल. महायुतीमध्ये असे सुरू असेल तर निवडणूक लढवता येणार नाही, एक लक्षात ठेवा अकॅशनला Reaction असेल याबाबत वरिष्ठनी काळजी घ्यावी, बरं प्रचार करायचा की फोडा फोडी करावी हे ही ठरवा” असं संजय शिरसाट म्हणाले.
“लोक ऑप्शन शोधत असतात, याचा अर्थ प्रवेश द्या असे होत नाही. बावनकुळेला माहिती आहे ते सगळीकडे होते. असे प्रवेश घेत असाल तर तुम्हाला लखलाभ. आम्ही भाजपचे लोक घेत नाही, मग त्यांनी फोडणे कितपत योग्य आहे?” असा सवाल संजय शिरसाट यांनी विचारला. “अजित दादा अर्थमंत्री आहेत त्यांना अधिकार आहेत मान्य. मात्र मुख्यमंत्री हे मोठे असतात त्यांना सर्वाधिकार असतात आणि तिजोरी मालक कुणी असेना ठरवताना सगळे ठरवतात. विकासाच्या आड कुणी येऊ शकत नाही” असं संजय शिरसाट म्हणाले.
निवडणुका पुढे जाऊ शकतात असे वाटते
अजित पवार यांचं अंबेजोगाई येथे विकासाबद्दल केलेलं एक विधान चर्चेत आहे, त्यावर संजय शिरसाट म्हणाले की, “अजित पवारांनी ते बारामती पुरते बोलले असावे, सगळे नेते विकास करतात, प्रत्येकाला आपला भाग प्रिय आहे, त्यांच्या नेत्यांबद्दल बोलले ” “आज कोर्टाच्या निकालावर लक्ष आहे. आकडेवारी पहिली तर तफावत दिसते न्यायालयाच्या लक्षात आलाय वेगळा निर्णय येऊ शकतो निवडणुका पुढे जाऊ शकतात असे वाटते” असं संजय शिरसाट म्हणाले.
आज कराडची आठवण आली, उद्या…
“घराणेशाही लाट आलेली आहे मान्य आहे. लोकशाहीत कॉन्फिडन्स असेल तर जनता तुम्हाला स्वीकारेल. हे लोण सगळीकडे पसरले आहे, कुणाला नाव ठेवण्यात अर्थ नाही” असं संजय शिरसाट यांनी सांगितलं. “दोस्ती असेल मी त्यावर भाष्य करणार नाही. बीडची बातमी नाही आली तर पेपर वाचल्यासारखा वाटत नाही. याबाबत तिथल्या नेत्यांनी बघावे आज कराडची आठवण आली, उद्या आणखी कुणाची येईल” असं संजय शिरसाट धनंजय मुंडेंबद्दल म्हणाले.
