रामराजे-उदयनराजेंचा अबोला संपला, पुण्यातील विवाह सोहळ्यात जादू की झप्पी

आधी सातारा शासकीय विश्रामगृहात आणि आता पुण्यात झालेल्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

रामराजे-उदयनराजेंचा अबोला संपला, पुण्यातील विवाह सोहळ्यात जादू की झप्पी


पुणे/सातारा : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) आणि राज्यसभेचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. उदयनराजेंनी राष्ट्रवादीला रामराम करेपर्यंत दोन्ही राजेंमध्ये झालेल्या टोकाच्या वादांचा साक्षीदार उभा महाराष्ट्र आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून दोघांमधील मतभेद संपल्याचं चित्र आहे. पुण्यातील एका विवाह सोहळ्यात उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक निंबाळकर समोरासमोर आले. ही भेट साधीसुधी नव्हती, तर दोघांनी चक्क गळाभेट घेतली. (BJP MP Chhatrapati Udayanraje Bhosle hugs Ramraje Naik Nimbalkar at Pune Wedding)

दोन महिन्यांपूर्वी सातारा शासकीय विश्रामगृहात आणि आता पुण्यात झालेल्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विवाह सोहळ्यातील उदयनराजे-रामराजेंच्या गळाभेटीने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे 2014 च्या निवडणुकांपासून सुरु असलेला अबोला संपला की काय, अशी कुजबूज रंगली आहे.

विस्तवही न जाणारे ‘दोन राजे’ चक्क एकत्र

लोकसभा निवडणुकीपूर्वी रामराजे नाईक निंबाळकर आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. राष्ट्रवादीमध्ये असणारे उदयनराजे अचानक खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये गेले. त्यानंतर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत रामराजे नाईक निंबाळकर यांनी उदयनराजेंवर सडकून टीका केली होती. त्यानंतर उदयनराजेंनी रामराजेंची जीभ हासडण्याचीही भाषा केली होती.

दोघांमधील वाद इतका ताणला गेला होता की खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांमधील वाद सोडवण्यात पवारांनाही यश आले नव्हते. या दोघांमधील वाद सातारा जिल्ह्याने वेळोवेळी पाहिला आहे. मात्र, ऑक्टोबर महिन्यात शासकीय विश्रामगृहात दोघांना दिलखुलास गप्पा मारताना पाहून सर्वच अचंबित झाले.

संबंधित बातम्या :

उदयनराजे आणि रामराजे यांच्यातला अबोला अखेर संपला, साताऱ्यात दोघांच्या मनसोक्त गप्पा

व्हाय इज कॉमन सेन्स कॉमन, खरंच मला कळत नाही, उदयनराजेंचं भुजबळांना उत्तर

मराठा आरक्षणावर योग्यवेळी सपाटून बोलणार; उदयनराजेंचा सूचक इशारा

(BJP MP Chhatrapati Udayanraje Bhosle hugs Ramraje Naik Nimbalkar at Pune Wedding)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI