फाडफाड इंग्रजी ते कॉलर उडवण्याची स्टाईल, डॅशिंग राजकारणी उदयनराजे भोसलेंची राजकीय कारकीर्द

उदयनराजे भोसले यांची स्टाईल आणि बोलण्याची शैली हा कायम चर्चेचा विषय असतो. | Udayanraje Bhosale

फाडफाड इंग्रजी ते कॉलर उडवण्याची स्टाईल, डॅशिंग राजकारणी उदयनराजे भोसलेंची राजकीय कारकीर्द
उदयनराजे भोसले, भाजप खासदार
Follow us
| Updated on: May 20, 2021 | 4:33 PM

मुंबई: उदयनराजे भोसले या नावाभोवती महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळेच वलय आहे. उदयनराजे यांची स्टाईल, बोलण्याची शैली आणि राजकारणाची एकूणच पद्धत या सगळ्याची लोकांमध्ये कायम चर्चा असते. 2019 च्या लोकसभा पोटनिवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघातील उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) विरुद्ध श्रीनिवास पाटील ही लढत चांगलीच गाजली होती. या लढतीत उदयनराजे भोसले यांचा पराभव झाल्यानंतर भाजपने त्यांची राज्यसभेवर वर्णी लावली होती. (BJP MP Udayanraje Bhosale political journey)

तेव्हापासून मराठा आरक्षण किंवा लॉकडाऊन या दोन मुद्द्यांवर उदयनराजे भोसले यांनी घेतलेल्या भूमिका चांगल्याच गाजल्या. राज्य सरकारने लॉकडाऊनचे आदेश दिल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात भीक मांगो आंदोलन केले होते. तर सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर उदयनराजे यांनी मराठा लोकप्रतिनिधींना घराबाहेर पडू देऊ नका, त्यांना रस्त्यातच आडवा, असा आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिला होता. त्यामुळे आगामी काळात राज्यात मराठा आंदोलन तापल्यास त्यामध्ये उदयनराजे भोसले महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे.

उदयनराजे भोसलेंचा राजकीय प्रवास

उदयनराजे भोसले 1991साली राजकारणात आले. सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीचा प्रारंभ केला. 1991 ते 1996 असे पाच वर्षं ते नगरसेवक होते. शिवसेना-भाजप युतीचे सरकार असताना उदयनराजे भाजपवासी झाले आणि त्यांची महसूल खात्याचे राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली. 2008 मध्ये उदयनराजे काँग्रेसमध्ये गेले. पण, 2009च्या लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या जागावाटपात सातारा लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडे होती. त्यामुळे मग शरद पवारांनी त्यांना राष्ट्रवादीत घेतलं आणि लोकसभेची उमेदवारी दिली. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवले होते.

उदयनराजेंची कॉलर उडवण्याची स्टाईल

उदयनराजे भोसले यांची स्टाईल आणि बोलण्याची शैली हा कायम चर्चेचा विषय असतो. माध्यमांना प्रतिक्रिया देताना इंग्रजी भाषेचा वापर किंवा आवेशपूर्ण बोलणे या उदयनराजेंच्या स्टाईलवर अनेकजण फिदा आहेत. याशिवाय, त्यांची कॉलर उडवण्याची स्टाईलही तरुणांमध्ये लोकप्रिय आहे.

अगदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही उदयनराजे भोसले यांच्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलची दखल घेतली होती. 2019 मध्ये कराडच्या प्रचारसभेतील आवेशपूर्ण भाषणाच्या शेवटी उदयनराजे भोसले यांनी स्वत:ची कॉलर उडवली. त्यानंतर उदयनराजे भोसले आपल्या जागेवर जाऊन बसले. तेव्हा त्यांच्या शेजारीच बसलेल्या शरद पवार यांनी आपल्या हाताने उदयनराजे भोसले यांची कॉलर उडविली.

शरद लेवे खून खटल्यात अटक

राष्ट्रवादीचे नगरसेवक शरद लेवे यांच्या खूनप्रकरणी उदयनराजे यांना 1999 साली तुरुंगात जावे लागले. त्यानंतर ते 22 महिने जेलमध्ये होते. तुरुंगापेक्षा रुग्णालयातच त्यांचा मुक्काम जास्त काळ होता. तेथे त्यांची बडदास्त ठेवली गेल्याचा आरोप झाला. लेवे खून खटल्यात न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. पुढे सरकारने या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात आव्हान दिले आणि अजूनही ते प्रलंबित आहे.

महागड्या गाड्यांचा शौक

उदयनराजे भोसले यांना महागड्या गाड्या बाळगण्याचा मोठा शौक असल्याचे सांगितले जाते. नेहमी त्यांच्या ताफ्यात दहा ते बारा आलिशान गाडय़ा असतात. त्यांच्या गाडी वेगात चालवण्याचे अनेक किस्से साताऱ्यात लोकप्रिय आहेत. त्यांनी एकदा 35 मिनिटांत सातारा ते पुणे अंतर पूर्ण केल्याची दंतकथा आजही साताऱ्यात सांगितली जाते.

रात्री शहरात फेरफटका मारतात, सामान्यांशी आपुलकीने बोलतात

उदयनराजे भोसले कधी काय करतील याचा नेम नसतो. मध्यंतरी त्यांनी पालिकेला मिळालेल्या गाड्यांमधून फेरफटका मारला होता. उदयनराजे यांना रात्री शहरात फेरफटका मारण्याची सवय आहे. असंच फिरताफिरता एकदा ते साताऱ्यातील बस स्टँडजवळ पोहोचले. तेव्हा तिथे काही रिक्षावाले उभे होते. उदयनराजे यांनी त्यांना बोलावून एका रात्रीत तुमचा किती रुपयांचा धंदा होता, असे विचारेल. यावर रिक्षाचालकांनी उत्तर दिल्यानंतर उदयनराजेंनी खिशातून नोटा काढत या रिक्षाचालकांच्या हातावर ठेवल्या होत्या. त्यानंतर आता घरी जाऊन झोपा, असा सल्ला रिक्षाचालकांना दिला.

‘लोकप्रतिनिधींना घराबाहेर पडू देऊ नका, रस्त्यातच अडवा’

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द ठरवल्यानंतर उदयनराजे भोसले आक्रमक झाले होते. हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जरी असला तरी राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे. वेगवेगळ्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी आतापर्यंत आपली भूमिका का स्पष्ट मांडली नाही?, असा संतप्त सवाल उपस्थित करत उदयनराजे यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना टोला लगावला आहे. मराठा समाजाने यापुढे आंदोलन करू नये, त्यापेक्षा निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीना रस्त्यात अडवा आणि घरातून बाहेर फिरू देऊ नका, असा आदेश मराठा समाजाला दिला होता.

(BJP MP Udayanraje Bhosale political journey)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.