Bhaskar Jadhav: रक्तापात होईल, यांना फक्त शिवसेना संपवायचीय, भास्कर जाधवांचा एकनाथ शिंदेंना इशारा, भाजपवर घणाघात

मुख्यमंत्री पदी निवड झाल्याने एकनाथ शिंदे यांच्यावरील जबाबदारी वाढली आहे. मात्र, हे करीत असताना आपले मूळ विसरता कामा नये. सध्या जे सुरु आहे ते केवळ सत्तेसाठी असेच चित्र आहे. त्यामुळे तुमच्या या भूमिकेमुळे नेमके नुकसान कुणाचे होतेय हे देखील लक्षात घेणे गरजेचे आहे. शिवाय राजकारणात कुणाला कुठे थांबायचे हे कळाले तोच खरा नेता असे म्हणत भास्कर यांनी सूचक विधान केले आहे.

Bhaskar Jadhav: रक्तापात होईल, यांना फक्त शिवसेना संपवायचीय, भास्कर जाधवांचा एकनाथ शिंदेंना इशारा, भाजपवर घणाघात
आ. भास्कर जाधव
राजेंद्र खराडे

|

Jul 04, 2022 | 2:17 PM

मुंबई :  (Assembly) विधानसभेत सोमवारी बहुमत चाचणी झाल्यानंतर अनेकांनी आपल्या मनोगतामधून राज्यात झालेल्या राजकीय नाट्यावर भाष्य केले. लक्षवेधी ठरले ते शिवसेना नेते (Bhaskar Jadhav) भास्कर जाधव हे. त्यांनी मुख्यमंत्री पदी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक विराजमान झाल्याने (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांचे कौतुक तर केले पण यामागे भाजपाचा उद्देश काय हे देखील त्यांच्या निदर्शनास आणून दिले. एकीकडे शिवसेनेचे 40 शिलेदार तुमच्या बाजूने आहेत तर दुसरीकडे पक्ष वाचवण्यासाठी इतर शिवसैनिक हे जीवाचे रान करीत आहेत. त्यामुळे कोण कुणावर घात करणार आहे.. कोण कुणाला संपवणार आहे..कोण कुणाला घायाळ करणार आहे याचा विचार करा असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला तर दुसरीकडे हे घडवण्यासाठी केवळ भाजप जबाबदार असून आता ही राजकीय खेळी यशस्वी करण्यासाठी किती पाप हा पक्ष करणार असे म्हणत त्यांनी भाजपावर घणाघाती टीका केली आहे.

लढाई शिवसैनिकांची फायदा भाजपाचा

सध्या शिवसैनिकांचे दोन गट निर्माण झाले आहेत. हे सर्व षडयंत्र कुणाचे हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही. मतभेदामुळे शिवसैनिक लढतोय आणि त्याचा फायदा भाजपाला होत आहे. त्यामुळे वेळीच ही खेळी ओळखणे गरजेचे होते. हे सर्वकाही केवळ सत्तेसाठी सुरु आहे. सरकार स्थापन झाल्यापासून ते पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे ओळखणे गरजेचे असल्याचे जाधव यांनी सांगितले.

ज्याला थांबायचे कळाले तोच खरा नेता

मुख्यमंत्री पदी निवड झाल्याने एकनाथ शिंदे यांच्यावरील जबाबदारी वाढली आहे. मात्र, हे करीत असताना आपले मूळ विसरता कामा नये. सध्या जे सुरु आहे ते केवळ सत्तेसाठी असेच चित्र आहे. त्यामुळे तुमच्या या भूमिकेमुळे नेमके नुकसान कुणाचे होतेय हे देखील लक्षात घेणे गरजेचे आहे. शिवाय राजकारणात कुणाला कुठे थांबायचे हे कळाले तोच खरा नेता असे म्हणत भास्कर यांनी सूचक विधान केले आहे. तुमच्या या भूमिकेमुळे नेमकं काय झालंय याचा विचार होणे गरजेचे असल्याचे म्हणत शिंदे यांनी यामध्ये कुठेतरी थांबणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. तुम्ही तुमचे दु:ख मांडले असते तर यामधून पर्याय निघाला असता असेही जाधव यांनी सुनावले.

हे सुद्धा वाचा

आमदार तुमच्या सोबत शिवसैनिक आजही खंबीर

सत्तेची समीकरणे बदलली असली तरी पक्ष हा संपणार नाही. तुमच्या बंडामुळे पक्षाचे नुकसान झाले असले तरी ते भरुन काढण्यासाठी शिवसैनिक खंबीर आहे. तुमच्याबरोबर जे आले ते आमदार आहेत असे म्हणत बंडखोरांवर भास्कर जाधव यांनी हल्ला चढविला. शिसैनिकांचे विभाजन कऱण्याचा डाव कुणाचा आहे हे ओळखणे गरजेचे असल्याचे मत जाधव यांनी व्यक्त केले आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें