AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपचं ‘मिशन 2 कोटी व्होट’, बुथ रचनेवर भर, कार्यकर्त्यांच्या बैठकीत नवा संकल्प

आगामी काळात जो वैचारिक संघर्ष होईल, तो प्रामुख्याने आपण विरुद्ध इतर असाच होणार असल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय.

भाजपचं 'मिशन 2 कोटी व्होट', बुथ रचनेवर भर, कार्यकर्त्यांच्या बैठकीत नवा संकल्प
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
| Updated on: Apr 06, 2021 | 7:34 PM
Share

पुणे : भाजपच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठा दावा केलाय. आगामी काळात भाजपा विरुद्ध इतर असाच राजकीय आणि वैचारिक संघर्ष होणार आहे. छत्तीसगडमधील घटना अतिशय वेदनादायीच आहे. देशभरात एक सुप्त संघर्ष सुरु आहे. हे सुप्त संघर्ष निर्माण करणारे स्लीपर सेल अतिशय शांतपणे आपल्या विरोधात संघर्ष निर्माण करत आहेत. त्यामुळे आगामी काळात जो वैचारिक संघर्ष होईल, तो प्रामुख्याने आपण विरुद्ध इतर असाच होणार असल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय. (BJP’s mission for 2024 is 2 crore votes, claims BJP state president Chandrakant Patil)

भाजपचं ‘मिशन 2 कोटी व्होट’

2014 च्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढून आपल्याला 122 जागा मिळाल्या. या निवडणुकीत आपल्याला एक कोटी 47 लाख मते मिळाली. 2019 च्या निवडणुकीत शंभर जागा कमी लढूनही आपल्याला एक कोटी 42 लाख मते मिळाली. 2024 च्या निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढवून, दोन कोटी पेक्षा जास्त मते मिळवायची आहेत. यासाठी बूथ रचना अतिशय सक्षम झाली पाहिजे. असं सांगत पाटील यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले.

भाजपचा स्थापना दिवस साजरा

भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन यंदा साजरा होत असताना भविष्याच्या दृष्टीकोनातून संघटना वाढीसह पक्षातील नव्या कार्यकर्त्यांची वैचारिक बैठक पक्की होणे गरजेचं आहे. त्यासाठी अभ्यास वर्गाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जावेत, असा संकल्प चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला. भाजपच्या 41 व्या स्थापना दिनानिमित्त पुणे शहर भाजपा कार्यालयात आयोजित व्हर्चुअल रॅलीला पाटील यांनी संबोधित केलं. यावेळी व्यासपीठावर पुण्याचे खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे शहर भाजपा अध्यक्ष जगदीश मुळीक उपस्थित होते.

कार्यकर्ता हाच भाजपचा प्राण – बापट

भारतीय जनता पक्ष हा कोणी एका व्यक्तीने स्थापन केलेला नाही. त्यामुळे कुठल्याच एखाद्या कुटुंबाची यावर मालकी राहिलेली नाही. हा पक्ष सर्वसामान्यांचा पक्ष राहिला आहे. आपल्या नेत्यांनी देखील आपल्या कामामधून एक आदर्श सर्वांसमोर ठेवला. त्यामुळे कार्यकर्ता हा या पक्षाचा प्राण आहे. कारण, आपली वैचारिक बैठक पक्की आहे, असं खासदार गिरीश बापट म्हणाले. महापौर मुरलीधर मोहोळ आणि जगदीश मुळीक यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.

संबंधित बातम्या :

Maharashtra Weekend Lockdown : आमदारांचा निधी वाढवला, पण सर्वसामान्यांना एक रुपया नाही, भाजपचा सरकारवर हल्लाबोल

‘मातोश्री’च्या अंगणात शिवसेनेला जबर धक्का, माजी आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

BJP’s mission for 2024 is 2 crore votes, claims BJP state president Chandrakant Patil

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.