तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्या

मुंबई : तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराच्या तोफा आज  सायंकाळी थंडावल्या. 23 एप्रिलला होणाऱ्या या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 जागांसाठी मतदान होईल. राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार सभा घेत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. आता त्याला मतदार काय प्रतिसाद देतात हे 23 मे रोजी निकालावरुनच स्पष्ट होईल. मागील काही काळात राज्यभरात निवडणूक प्रचाराचा धुरळा […]

तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्या
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

मुंबई : तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराच्या तोफा आज  सायंकाळी थंडावल्या. 23 एप्रिलला होणाऱ्या या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 जागांसाठी मतदान होईल. राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार सभा घेत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. आता त्याला मतदार काय प्रतिसाद देतात हे 23 मे रोजी निकालावरुनच स्पष्ट होईल.

मागील काही काळात राज्यभरात निवडणूक प्रचाराचा धुरळा उडाला आहे. त्यात सत्ताधारी पक्षांसोबत सर्वच विरोधी पक्षांचाही समावेश होता. भाजपकडूनही पंतप्रधान मोदींसह भाजप अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही प्रचाराच्या रणधुमाळीत पूर्ण ताकदीने उतरले. रॅली, रोड शोसोबतच चौक सभा, घरोघरी भेटीगाठी याचाही प्रचारात वापर झाला. दुसरीकडे विरोधी पक्षांकडून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी प्रचारात मेहनत घेतली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी आदींनीही आपल्या प्रचार भाषणांतून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. यावेळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या.

मनसेने तर निवडणुकीत सहभाग नसतानाही महाराष्ट्रभर भाजपविरोधी आघाडी उघडली. त्यांच्या सभांमध्ये प्रचाराचा वेगळाच पॅटर्न पाहिला मिळाला. विरोधकांची जुनी आश्वासने आणि सध्याचे वास्तव यावर आधारित राज ठाकरेंच्या भाषणांनी भाजपला चांगलेच जेरीस आणले. तिसऱ्या टप्प्यासाठी 23 एप्रिलला मतदान होणार असून 23 मे रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या टप्प्यात 14 जागांवर मतदान होईल.

तिसऱ्या टप्प्यात ‘या’ ठिकाणी मतदान होणार

जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

या टप्प्यातील लक्षवेधी लढती:

बारामती:  सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध कांचन कुल (भाजप)

माढा : रणजितसिंह नाईक निंबाळकर (भाजप) विरुद्ध संजय शिंदे (राष्ट्रवादी)

अहमदनगर: सुजय विखे (भाजप) विरुद्ध संग्राम जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस)

रायगड: अनंत गीते  (शिवसेना) विरुद्ध सुनिल तटकरे (राष्ट्रवादी)

रत्नागिरी-सिंधुदुर्ग : विनायक राऊत  (शिवसेना) विरुद्ध नवीनचंद्र बांदिवडेकर (काँग्रेस)

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.