AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भसाभसा सभा! 24 तासात फडणवीस, पवार, शाह, उद्धव आणि राज ठाकरेंच्या तीसहून अधिक सभा

देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात, राज ठाकरे या सर्वच नेत्यांच्या सभांचा धडाका आज दिवसभरात पाहायला मिळणार आहे. अमित शाह आणि योगी आदित्यनाथही सभा घेण्यासाठी महाराष्ट्रात येत आहेत

भसाभसा सभा! 24 तासात फडणवीस, पवार, शाह, उद्धव आणि राज ठाकरेंच्या तीसहून अधिक सभा
| Updated on: Oct 10, 2019 | 10:37 AM
Share

मुंबई : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली असून प्रचाराने चांगलाच जोर धरला आहे. एकमेकांवर टीकांचे बाण आणि आश्वासनांची खैरात सुरु झालेली आहे. महाराष्ट्रातील सर्वच दिग्गज नेत्यांनी महाराष्ट्र पालथा घालण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, मनसे अध्यक्ष राज ठाकरे या सर्वच नेत्यांच्या सभांचा धडाका (Campaigns for Maharashtra Vidhansabha Election) आज दिवसभरात पाहायला मिळणार आहे.

विधानसभा निवडणुकांच्या मैदानात उतरलेले शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरेही दोन सभा घेणार आहेत. याशिवाय भाजपाध्यक्ष अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत.

कोणाच्या कुठे सभा?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (सभास्थळ- उमेदवार)

मंगळवेढा, सोलापूर – माळशिरस, सोलापूर – उमेदवार राम सातपुते (भाजप- रिपाइं) म्हसवड, सातारा – फलटण, सातारा – उमेदवार दिगंबर आगवणे (भाजप- रिपाइं) भोसरी, पुणे येथे रोड शो – उमेदवार महेश लांडगे (भाजप) पिंपरी चिंचवड – उमेदवार लक्ष्मण जगताप (भाजप)

भाजपाध्यक्ष अमित शाह

जत, सांगली – उमेदवार विलासराव जगताप (भाजप) अक्कलकोट, सोलापूर – उमेदवार सचिन शेट्टी (भाजप) (भाजपच्या दारातून परतलेले काँग्रेस उमेदवार सिद्धराम म्हेत्रेंविरोधात) तुळजापूर, उस्मानाबाद – उमेदवार राणा जगजितसिंह पाटील (भाजप) (राष्ट्रवादीतून आयात) किल्लारी, लातूर –

उद्धव ठाकरे

घनसावंगी, जालना – उमेदवार हिकमत उढाण (शिवसेना) वैजापूर, औरंगाबाद – कन्नड, औरंगाबाद – औरंगाबाद शहर –

Campaigns for Maharashtra Vidhansabha Election

आदित्य ठाकरे शहापूर, ठाणे – उमेदवार पांडुरंग बरोरा (शिवसेना) (राष्ट्रवादीतून आयात) इगतपुरी, नाशिक – उमेदवार निर्मला गावित (शिवसेना) (काँग्रेसमधून आयात)

राज ठाकरे

सांताक्रुझ, मुंबई गोरेगाव, मुंबई

शरद पवार

बुट्टीबोरी, नागपूर काटोल, नागपूर – उमेदवार अनिल देशमुख (राष्ट्रवादी)

बाळासाहेब थोरात

तामलवाडी, उस्मानाबाद –  लामजना, औसा, लातूर – उमेदवार बसवराज पाटील (काँग्रेस) शिरुर, अनंतपाळ, लातूर  थोरमोठे लॉन्स, लातूर ग्रामीण – उमेदवार धीरज देशमुख (काँग्रेस) कव्हा, लातूर शहर – उमेदवार अमित देशमुख (काँग्रेस)

योगी आदित्यनाथ

कुलाबा, मुंबई – उमेदवार राहुल नार्वेकर (भाजप) विठ्ठलवाडी, काळबादेवी, मुंबई –  कांदिवली, मुंबई – उमेदवार अतुल भातखळकर (भाजप) जिंतूर, परभणी – उमेदवार मेघना बोर्डीकर (भाजप) रावेर, जळगाव – उमेदवार हरिभाऊ जावळे (भाजप)

Campaigns for Maharashtra Vidhansabha Election

वाचा – ‘या’ विषयावर सामनात अग्रलेख लिहून दाखवा, ओवेसींचं ठाकरेंना आव्हान

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.