AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिथे मोदींची पहिली सभा झाली, त्या वर्ध्यात जातीची समीकरणं काय आहेत?

वर्धा : वर्धा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यंदाही जातीय समीकरणाभोवतीच फिरते आहे. तेली समाजाचे भाजप उमेदवार आणि विद्यमान खासदार रामदास तडस विरुद्ध कुणबी समाजाच्या चारुलता राव टोकस असा सामना होतो आहे. चारुलता टोकस प्रदेश काँग्रेसच्या माजी अध्यक्ष दिवंगत प्रभा राव यांच्या कन्या आहेत. 2014 मध्ये तडस यांनी कुणबी समाजाच्या सागर दत्ता मेघे यांचा दारुण पराभव केला […]

जिथे मोदींची पहिली सभा झाली, त्या वर्ध्यात जातीची समीकरणं काय आहेत?
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:07 PM
Share

वर्धा : वर्धा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यंदाही जातीय समीकरणाभोवतीच फिरते आहे. तेली समाजाचे भाजप उमेदवार आणि विद्यमान खासदार रामदास तडस विरुद्ध कुणबी समाजाच्या चारुलता राव टोकस असा सामना होतो आहे. चारुलता टोकस प्रदेश काँग्रेसच्या माजी अध्यक्ष दिवंगत प्रभा राव यांच्या कन्या आहेत. 2014 मध्ये तडस यांनी कुणबी समाजाच्या सागर दत्ता मेघे यांचा दारुण पराभव केला होता. तेव्हा देशभर प्रचंड मोदी लाट होती आणि त्याचा फायदा तडस यांना झाला. यंदा मात्र लोकसभेच्या रिंगणात कुणबी विरुद्ध तेली या दोन जातींमधील टोकाचा संघर्ष बघायला मिळतो आहे.

लोकसभेची निवडणूक म्हटली की वर्ध्यात कुणबी विरुद्ध तेली या दोन जातींमधील टोकाचा संघर्ष बघायला मिळतो. यावेळी तडस यांच्याऐवजी भाजपाकडून सागर मेघे यांना उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा सुरू होताच संतप्त झालेल्या तेली समाजानं वर्ध्यात एक मेळावा घेऊन तडस यांना बदलल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा भाजपाला दिला होता. मेघे कुणबी समाजाचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे संतापलेल्या तेली समाजानं हा इशारा दिल्यानं राजकारणात जातीच्या मुद्यानं पुन्हा एकदा उचल खाल्ली.

त्यानंतर भाजपकडून तडस यांना उमेदवारी देण्यात आली तर काँग्रेसनं कुणबी समाजाच्या चारुलता टोकस यांना उमेदवारी दिली आणि गांधी यांच्या भूमीतील राजकारण सध्या दोन जातींमध्ये विभागले गेले आहे. मतदारसंघांमध्ये तुल्यबळ असलेल्या या दोन जाती निवडणुकीच्या निमित्तानं आमनेसामने उभ्या ठाकल्यात. वर्धा लोकसभा मतदारसंघात कुणबी, तेली यांच्यासोबतच नवबौद्ध आणि एससी समाजाचं प्राबल्य आहे.

वर्ध्याचे जातिनिहाय मतदार : तेली समाज – 22% कुणबी समाज – 23% हिंदी भाषिक – 16% आदिवासी – 12% एससी – 18% मुस्लिम – 5% इतर – 4 %

वर्धा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी तीन ठिकाणी काँग्रेसचे तर तीन ठिकाणी भाजपाचे आमदार आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या या मतदारसंघात आज भाजपचा बोलबाला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार जिल्ह्यातले भाजपचे बहुजन समाजातील नेते या सगळ्यांनी मिळून काँग्रेसला धोबीपछाड दिलीय. वर्धा मतदारसंघात कुणबी समाजाची मतं तेली समाजापेक्षा अधिक आहेत पण या समाजाचं तेली समाजासारखे एकगठ्ठा मतदान होत नाही. त्याचा फायदा तडस यांना होऊ शकतो.

2014 मध्ये भाजपचा दणदणीत विजय झाला असला तरी सध्या ते वातावरण नाही. सेवाग्राम विकास आराखड्यातील उणिवा, हायमस्टमधील घोळ, व्यायामशाळांवर दाखविलेला अवास्तव खर्च आणि आदर्श ग्रामचा प्रत्यक्ष विकास, रस्त्यांच्या कामाचा दर्जा या बाबी गेल्या पाच वर्षाचं कामकाज बोलवून दाखवत आहे. त्यातच भाजप काँग्रेसशिवायबी बसप आणि वंचित आघाडीही निवडणुकीच्या रिंगणात आहे. बहुजन समाज पक्षानं बडे व्यवसायिक शैलेश अग्रवाल यांना उमेदवारी दिलीय. ते मोठ्या प्रमाणात दलितांची मतं घेऊ शकतात. त्याचा फटका टोकस यांना बसेल. दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीनं धनराज वंजारी या तेली समाजाच्या उमेदवारास मैदानात उतरवलंय. त्याचा फटका तडस यांना बसू शकतो.

महात्मा गांधी यांनी जात, धर्म, पंथ,वर्णमुक्त समाजाची स्वप्नं बघितली. त्यासाठी आजीवन संघर्ष केला. त्या महात्म्याच्या वास्तव्यानं पावन झालेल्या वर्धा जिल्ह्यात मात्र दोन प्रमुख जातींमधील टोकाचा संघर्ष हाच राजकारणाचा स्थायीभाव बनल्याचं दुर्दैवी चित्र आहे.

मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....