…पण आता ठाकरे सगळंच घेताहेत, ‘सामना’ संपादक पदावरुन चंद्रकांत पाटलांचा टोला

चंद्रकांत पाटील यांनी रश्मी ठाकरे यांचं अभिनंदन केलं, तसेच त्या खूप चांगलं काम करतील असंही सांगितलं.

...पण आता ठाकरे सगळंच घेताहेत, 'सामना' संपादक पदावरुन चंद्रकांत पाटलांचा टोला

नाशिक : “ठाकरे कुटुंब स्वतःसाठी काही घेत नाही, असं मला उद्धव ठाकरेंनी (Chandrakant Patil On Saamana Editor) सांगितलं होतं. मात्र, आता ठाकरे सगळंच घेताहेत”, अशी खोचक टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रश्मी ठाकरेंच्या ‘सामना’ संपादकपदी निवड होण्याबाबत केली. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’च्या संपादकपदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी रश्मी ठाकरे यांचं अभिनंदन केलं, तसेच त्या खूप चांगलं काम करतील असंही सांगितलं. मात्र, या मुद्यावरुन चंद्रकांत पाटलांनी ठाकरे कुटुंबावर टीकाही केली.

“रश्मी वाहिनींना खूप खूप शुभेच्छा. आमचं सरकार असतांना (Chandrakant Patil On Saamana Editor) त्यांना मी सिद्धिविनायक ट्रस्टचं अध्यक्षपद घ्या, म्हणून आग्रह धरला होता. उद्धव ठाकरे यांना मी स्वतः बोललो होतो. मात्र, ‘ठाकरे कुटुंब स्वतःसाठी काही घेत नाही’, असं त्यांनी मला तेव्हा सांगितलं होतं. पण आता ठाकरे सगळंच घेत आहेत. कुठलाही अनुभव नसताना त्यांनी मुलाला कॅबिनेट मंत्री पद दिलं. आता वहिनींना संपादक केलं. वहिनी ‘सामना’चं संपादक पद खूप चांगल्याने सांभाळतील”, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेला खोचक टोला लगावला.

हेही वाचा : रश्मी ठाकरे दैनिक सामनाच्या संपादक, सामनाच्या पहिल्या महिला संपादक

शिवाय “संजय राऊत नाराज हे मनाचे खेळ आहे. गेल्या तीन-चार महिन्यात आपण बघितले, सत्तेचा फेविकॉल इतका पक्का आहे की संध्याकाळी नाराजी दूर होते.”

रश्मी ठाकरे ‘सामना’च्या नव्या संपादक

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’च्या संपादकपदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी ‘सामना’ दैनिकाचं संपादकपद सोडलं होतं. त्यानंतर ही जबाबदारी कुणाकडे दिली जाणार याविषयी बरीच उत्सुकता होती. त्यानंतर जवळपास 2 महिन्यानंतर रश्मी ठाकरे यांची ‘सामना’च्या संपादकपदी निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे रश्मी ठाकरे (Chandrakant Patil On Saamana Editor) यांना ‘सामना’च्या पहिल्या महिला संपादक होण्याचा मान मिळाला आहे.

हेही वाचा : रश्मी ठाकरेंची सामनाच्या संपादकपदी निवड, अमृता फडणवीसांचं नवं ट्विट

Published On - 5:34 pm, Sun, 1 March 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI