पारनेर नगरसेवक ते कर्जमाफी, चंद्रकांत पाटलांचे 'रोखठोक'साठी चार प्रस्ताव

सामना वृत्तपत्रातील या आठवड्यातील रोखठोकसाठी माझे काही प्रस्ताव, या अंतर्गत जवळपास आठ ट्विट केले (Chandrakant Patil Suggest Topic Rokhthok) आहेत.

पारनेर नगरसेवक ते कर्जमाफी, चंद्रकांत पाटलांचे 'रोखठोक'साठी चार प्रस्ताव

मुंबई : राज्यातील वाढता कोरोना, भारत-चीन तणाव, राजकीय कुरघोडी सुरु आहेत. यावर गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून अनेक गोष्टींवर भाष्य करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सामना वृत्तपत्रातील या आठवड्यातील रोखठोकसाठी काही प्रस्ताव सुचवले आहेत. पारनेर नगरसेवक ते कर्जमाफी या विषयांवर जवळपास आठ ट्विट केले आहेत. (Chandrakant Patil Suggest Various Topic For Sanjay Raut Rokhthok)

चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासाठी सामनाच्या वृत्तपत्रातील या आठवड्यातील रोखठोकचे प्रस्ताव सुचवले आहेत.

नंबर 1 – “मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय 10 आयपीएस अधिकाऱ्यांची बदली…… ठाकरे सरकारचा कारभार अतिशय पारदर्शी आहे. तीन दिवसात बदलीचे आदेश रद्द……. मुख्यमंत्री कोण आहेत हे तर आम्ही दाखवून दिलं. हे सर्व यासाठीच घडलं कारण भाजपाची राज्य सरकारला पाडण्याची इच्छा आहे….”

नंबर 2 – “पारनेर नगरपरिषदेत अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या 5 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. सर्वांना आपापला पक्ष वाढवण्याची इच्छा होतच असते. पवार साहेब आणि ठाकरे साहेब दोन्हीही आपलेच आहेत. मात्र तरीही शिवसेना शांत बसणार नाही. हे सर्व यासाठीच घडलं कारण भाजपाची राज्य सरकारला पाडण्याची इच्छा आहे…..”

हेही वाचा : रात्रीच्या अंधारात नगरसेवक चोरणारे, आज राष्ट्रवादीकडे भीक मागत आहेत, मनसेचा शिवसेनेवर हल्ला

नंबर 3. “ठाकरे सरकार तर सर्वोत्तम आहे. यापूर्वी राज्याला असे प्रशासन कधीही लाभले नाही. मात्र कोरोनाचा मृत्यूदर वाढत चालला आहे. दिवसाला 6 हजार पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून येत आहेत. हे सर्व यासाठीच घडलं कारण भाजपाची राज्य सरकारला पाडण्याची इच्छा आहे…”

नंबर 4. “राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याचे ढोल बडवले. अजूनही अंमलबजावणी नाही. शेतकऱ्यांना वाईट दर्जाचे बियाणे दिले जात आहेत. (Chandrakant Patil Suggest Various Topic For Sanjay Raut Rokhthok)
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना अजूनही कर्ज देण्यात आलं नाही. हे सर्व यासाठीच घडलं कारण भाजपाची राज्य सरकारला पाडण्याची इच्छा आहे…..” असे सलग आठ ट्विट चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्यासोबतच त्यांनी चार पर्याय त्यांना सुचवले आहेत.

हेही पाहा : TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज! 

दरम्यान आता यावर शिवसेना किंवा संजय राऊत काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार (Chandrakant Patil Suggest Various Topic For Sanjay Raut Rokhthok) आहे.

संबंधित बातम्या : 

‘सामना’ची भूमिका रोज बदलते, कधी पवारांच्या बाजूने, कधी राज्यपालांच्या : देवेंद्र फडणवीस

गोपीचंद महाशयांचे घाणेरडे वक्तव्य फडणवीस किंवा भाजपची ‘मन की बात’ नाही ना? : सामना

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *