AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदित्य ठाकरेंमध्ये मुख्यमंत्रिपदाची क्षमता आहे का, चंद्रकांत पाटील म्हणतात…

पुणे : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यामध्ये मुख्यमंत्रिपदाची क्षमता आहे की नाही, हे जनता ठरवेल, असं वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. युतीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील. 50-50 चा फॉर्म्युला असून विद्यमान आमदाराच्या जागेला हात लावणार नसल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. ‘भाजपमध्ये मेगाभरती’ सुरु असल्याच्या चर्चांनंतर खुद्द […]

आदित्य ठाकरेंमध्ये मुख्यमंत्रिपदाची क्षमता आहे का, चंद्रकांत पाटील म्हणतात...
| Updated on: Aug 02, 2019 | 6:15 PM
Share

पुणे : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यामध्ये मुख्यमंत्रिपदाची क्षमता आहे की नाही, हे जनता ठरवेल, असं वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. युतीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील. 50-50 चा फॉर्म्युला असून विद्यमान आमदाराच्या जागेला हात लावणार नसल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

‘भाजपमध्ये मेगाभरती’ सुरु असल्याच्या चर्चांनंतर खुद्द मुख्यमंत्र्यांनीच पक्ष आता हाऊसफुल्ल झाल्याचं म्हटलं होतं. मात्र, आता तीन आलेत निवडणूक अजून बाकी आहे, अजून येतील, असं सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केल्यामुळे ही भरती दुसऱ्या टप्प्यात होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुख्यमंत्रिपदाबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, उद्धव ठाकरे आणि पक्ष निर्णय घेईल. लोकशाही असल्यामुळे आदित्य ठाकरे यांच्यामध्ये मुख्यमंत्रिपदाची क्षमता आहे की नाही, हे जनता ठरवेल. विधानसभेला निम्म्या-निम्म्या जागा लढवण्याचा निर्णय झालेला आहे. विद्यमान आमदारांच्या जागेत बदल करणार नसल्याचंही चंद्रकांत पाटील म्हणाले. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते.

विखे वगळता निष्ठावंतांनाच संधी

भाजपमधील इनकमिंगमुळे पक्षाची संस्कृती बदलणार नाही. पक्षातील निष्ठावंतांना पक्षाने पदं दिली आहेत, एक फक्त विखे आहेत. मात्र सरकार चालवत असताना अनुभवी व्यक्ती लागतात म्हणून त्यांना संधी देण्यात आली, असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटलांनी दिलं.

नवीन लोकांना अॅडजस्ट करुन घेण्याची क्षमता आमच्या संघटनेमध्ये आहे. मात्र जे ऑड आहेत, ते आपोआप बाहेर पडतील, असंही चंद्रकांत पाटील मनमोकळेपणाने म्हणाले.

शरद पवारांनी तयार राहावं

आता तीन आले आहेत. निवडणूक अजून बाकी आहे, अजून येतील. शरद पवारांनी तीन गेलेत त्याचा धसका घेतला आहे. अजून जातील, याची मानसिकता ठेवावी, असा सूचक इशाराही चंद्रकांत पाटलांनी दिला. 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत बारामतीची जागा आम्ही जिंकणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पुढच्या लॉटमध्ये काँग्रेसचे नेते

राष्ट्रवादी टार्गेट आहे अशातला भाग नाही. पुढच्या लॉटमध्ये काँग्रेसमधील लोक असणार आहेत, असंही पाटील म्हणाले. ज्यांचा हिशेब चुकता करायचा आहे, त्यांना आम्ही घेणार नाही. मात्र घेतलं त्यांना तावून सुलाखून घेतलं आहे, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.

तुम्ही केलं म्हणजे भावनिक आवाहन आणि आम्ही केलं म्हणजे ईडीची धमकी, असा टोलाही पाटील यांनी लगावला. काही संस्थांमध्ये हस्तक्षेप करता येत नाही, ते तितकं सोपं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

एकनाथ खडसे यांनी भाजपसाठी खूप काम केलं आहे. नाथाभाऊंबद्दल सर्वांना आदर आहे, असंही पाटील म्हणाले. माझी विधानपरिषदेची टर्म अजून एक वर्ष बाकी आहे. त्यामुळे पक्ष सांगेल ती जबाबदारी पार पाडण्याची तयारी चंद्रकांत पाटलांनी दर्शवली.

हात वर करुन मतदान घ्या ना

निवडणूक कशी घ्यावी, हे आंदोलनावरुन ठरलं असतं तर बरं झालं असतं, असा टोलाही त्यांनी लगावला. हात वर करुन मतदान घेतलं, तरी आम्हाला चालेल, बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली तरी आम्हाला मान्य आहे, तरी आम्ही निवडून येऊ, असा विश्वास चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला.

कोकणातून वाहून जाणारं पाणी मराठवाड्याला

कोकणातून वाहून जाणारं पाणी अडवून ते पाणी मराठवाड्याला पिण्यासाठी आणि शेतीसाठी वापरणार असल्याचंही चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यासाठी 20 कोटींचा खर्च प्रस्तावित असल्याची माहिती त्यांनी दिली.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.