“आधी पक्ष फोडला आता घर फोडण्याचं काम सुरु”; शिंदे गटावर घणाघाती आरोप

ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदेवर घर फोडल्याचा घणाघाती आरोप करण्यात आला आहे. शिवसनेना नेते चंद्रकांत खैरे यांनी हा आरोप केला आहे.

आधी पक्ष फोडला आता घर फोडण्याचं काम सुरु; शिंदे गटावर घणाघाती आरोप
Follow us
| Updated on: Oct 06, 2022 | 6:57 PM

मुंबई : दसरा मेळाव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. दसरा मेळाव्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकमेकांवर घणाघाती टीका केली. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात जयदेव ठाकरे यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. यावरुनच ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदेवर घर फोडल्याचा घणाघाती आरोप करण्यात आला आहे. शिवसनेना नेते चंद्रकांत खैरे यांनी हा आरोप केला आहे.

BKC मैदानावार पार पडलेल्या शिंदे गटाच्या दसरा मेळावा झाला. बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आणि उद्धव ठाकरे यांचे बंधू जयदेव ठाकरे (Jaidev Thackeray)यांनी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला हजेरी लावली.

यांना एकटं पाडू नका. हा एकटा नाथ होऊ नका… हा एकनाथचं राहू द्या… ही तुम्हा सर्वांना विनंती आहे. एकनाथ शिंदेंच्या प्रेमापोटी मी इथे आलोय असं जयदेव ठाकरे म्हणाले होते.

जयदेव ठाकरे यांची शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात एंन्ट्री झाल्याने सगळेच अचंबित झाले. निहार ठाकरे यांच्यानंतर जयदेव ठाकरे यांनीही शिंदे गटाची वाट धरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

जयदेव ठाकरे यांना मंचावर आणून घर फोडण्याचं नीच काम शिंदे गटाने केले आहे असं म्हणत चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटावर पुन्हा एकदा घणाघात केला आहे.

आधी पक्ष फोडला आता घर फोडण्याचं काम सुरू आहे. उध्दव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात सर्व काही जिंकले असेही खैरे म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या भाषणात लोक उठून जात होते. पैसे देऊन गर्दी जमवल्याचा आरोप देखील खैरी यांनी केला आहे.

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.