AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘दोन-अडीच वर्षे मी ही आर्थर रोड कारागृहात, जे लोक स्वागतासाठी तेच नंतर लक्ष ठेवण्यासाठी’, भुजबळांची सांगितला जेलवारीचा अनुभव

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या जेलवारीचा भीषण अनुभव सांगितला. माझादेखील आर्थर रोड कारागृहाचा दोन-अडीच वर्षांचा अनुभव होता. अभिनेता संजय दत्तनेही कारागृहात टोप्या बनवल्याचं मला आठवतं असल्याचं भुजबळांनी सांगितलं. ते आज नाशिकमध्ये बोलत होते.

'दोन-अडीच वर्षे मी ही आर्थर रोड कारागृहात, जे लोक स्वागतासाठी तेच नंतर लक्ष ठेवण्यासाठी', भुजबळांची सांगितला जेलवारीचा अनुभव
Chhagan Bhujbal
| Edited By: | Updated on: Oct 30, 2021 | 12:42 PM
Share

नाशिक : मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची अखेर जामीनावर सुटका झालीय. तो आज कारागृहातून बाहेर आला. तर अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा हे आज बाहेर येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या जेलवारीचा भीषण अनुभव सांगितला. माझादेखील आर्थर रोड कारागृहाचा दोन-अडीच वर्षांचा अनुभव होता. अभिनेता संजय दत्तनेही कारागृहात टोप्या बनवल्याचं मला आठवतं असल्याचं भुजबळांनी सांगितलं. ते आज नाशिकमध्ये बोलत होते. (Minister Chhagan Bhujbal shared his experience in Arthur Road Jail)

नाशिकच्या कारागृहात अनेक स्वातंत्र्य योद्धे राहिले आहेत. साने गुरुजीही याठिकाणी होते. कारागृहात येणारे कैद्यांमध्ये अनेक प्रकारचे लोक असतात. काही समाजाला नकोसे असतात. तर काही लोकांना जामीन झाला तरी ते परत आत येतात. आतमध्ये सगळ्या सोयी असल्यानं काहीचं आत येणं जाणं सुरु असतं, असं मिश्किल वक्तव्य भुजबळांनी केलंय. त्याचबरोबर माझाही आर्थर रोड कारागृहाचा दोन अडीच वर्षाचा अनुभव आहे. गृहमंत्री असताना कारागृहातील पोलिसांचा पगार मी वाढवला. एक दिवस त्याच जेलमध्ये मला जावं लागलं. जे माझ्या स्वागतासाठी होते, नंतर तेच माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी काम करत होते, अशी खंत भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केली. आता दिवस परत बदलले आहेत. काही खऱ्या आरोपाखाली जेलमध्ये असतात तर काही खोट्या आरोपांखाली असतात, असंही ते म्हणाले.

‘संजय दत्तलाही टोप्या बनवताना पाहिलं’

कारागृहात सिनेमाचे कलाकार असतात तसे इतरही कलाकार असतात. संजय दत्त यांनीही कारागृहात टोप्या बनवल्याचं मला आठवतं. कैदी कसे जनावरांसारखे राहतात हे मी पाहिलं आहे. प्रचंड गर्दी असते. पण तरी देखील कोरोना आत घुसला नाही हे महत्वाचं आहे. अनेक लोक 15 हजारांचा जामीन भरू शकत नाहीत म्हणून वर्षानुवर्षे आत आहेत. अशा लोकांसाठी काम करणाऱ्या आता अनेक संस्था आहेत, आपणही त्याच असल्याचं भुजबळ यावेळी म्हणाले.

आर्यन खान कारागृहातून बाहेर

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी जामीन मिळाल्यानंतर आज सकाळी त्याची जेलमधून अखेर सुटका झाली आहे. तब्बल 27 दिवसांनंतर आर्यन खान जेलबाहेर आला आहे. सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास स्वत: शाहरुख खान आर्यन घेण्यासाठी ऑर्थर रोड कारागृहाबाहेर दाखल झाला. पुढची टेक्निकल प्रोसेस झाल्यानंतर आर्यन खान जेलबाहेर आला. आर्यनची ‘मन्नत’वर 27 दिवसानंतर घरवापसी झाली आहे.

आर्यन खानला क्रुझ ड्रग्ज प्रकरणी गुरुवारी कोर्टाने जामीन मंजूर केला होता. पण काल सुटकेची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने कालची रात्र त्याला तुरुंगात काढावी लागणार लागली. आज अगदी सकाळीच आर्यनच्या सुटकेची प्रकिया सुरु झाली. सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाली. अखेर 11 वाजताच्या सुमारास आर्यन खान ऑर्थर रोड तुरुंगाच्या बाहेर पडला. आर्यनच्या स्वागतासाठी मन्नत बंगल्यावरही मोठ्या प्रमाणात स्वागताची तयारी करण्यात आली आहे.

इतर बातम्या :

आटपाडी डेपोला कुलुप, आंदोलन सुरुच राहणार, ठाकरे सरकारला इशारा, एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्यावर गोपीचंद पडळकर आक्रमक

आर्यन खान सुटला, ‘ते’ दोघेही आजच सुटणार?; सुटकेसाठीची प्रक्रिया सुरू

Minister Chhagan Bhujbal shared his experience in Arthur Road Jail

29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.