AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आर्यन खान सुटला, ‘ते’ दोघेही आजच सुटणार?; सुटकेसाठीची प्रक्रिया सुरू

आर्यन खानची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आता अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेच्या यांच्या सुटकेसाठी प्रक्रिया सुरू होणार आहे. थोड्याच वेळात या दोघांचेही वकील कोर्टात पोहोचून आवश्यक ती कार्यवाही करतील. (munmun dhamecha and arbaaz merchant will walk out of jail today?)

आर्यन खान सुटला, 'ते' दोघेही आजच सुटणार?; सुटकेसाठीची प्रक्रिया सुरू
munmun dhamecha and arbaaz merchant
| Edited By: | Updated on: Oct 30, 2021 | 11:41 AM
Share

मुंबई: आर्यन खानची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आता अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेच्या यांच्या सुटकेसाठी प्रक्रिया सुरू होणार आहे. थोड्याच वेळात या दोघांचेही वकील कोर्टात पोहोचून आवश्यक ती कार्यवाही करतील. त्यानंतर या दोघांची तुरुंगातून सुटका होईल. मात्र, या दोघांची आजच सुटका होणार की त्यांना आजची रात्र तुरुंगात काढावी लागणार याबाबतचा सस्पेन्स कायम आहे.

अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमीचा यांच्या जामीन प्रक्रियेला थोड्याच वेळात होणार सुरुवात होणार आहे. अरबाजचे वडील अस्लम मर्चंट हे आपले वकील आणि जामीनदार यांना घेऊन कोर्टात पोहचले आहेत. मुनमुन धमेचाचे वकील रवी सिग आणि तिचा भाऊ प्रिन्स हे सुद्धा जामीनदार यांना घेऊन कोर्टात पोहोचले आहेत. अरबाज आणि मुनमुन यांनाही एक लाख रुपयांचा जामीन मंजूर झाला आहे. दोघांसाठी प्रत्येकी सात जण जामीनदार म्हणून राहणार आहेत.

म्हणून सात जामीनदार

जामिनाच्या नियमानुसार 15 हजार रुपयांच्यावर जामीन दिला असल्यास जामीनदारास सोलवनसी सर्टिफिकेट अर्थात तहसीलदारांच्या उत्पन्नाचा दाखला द्यावा लागतो. या आरोपींना 1 लाख रुपयांचा जामीन झाला आहे. एक लाख रुपयांचा जामीन यांना उपलब्ध होऊ शकतो. मात्र, त्याचा उत्पन्नचा दाखला उपलब्ध व्हायला वेळ लागेल. या नियमातून वाट काढण्यासाठी अरबाज आणि मुनमुन यांच्या वकिलांनी सात जामीनदार आणले आहेत. त्यांचं उत्पन्न 15 हजार रुपयांच्या खाली आहे. त्यामुळे त्यांना तहसीलदारांच्या उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही. अरबाज आणि मुनमुन याच्या वकिलांनी हा मार्ग काढल्याने या दोघांच्या जामिनाची प्रक्रिया थोड्याच वेळात सुरू होईल, असं सूत्रांनी सांगितलं.

कोण आहे अरबाझ मर्चंट?

क्रुझ ड्रग्ज प्रकरणात अटक झालेला अरबाझ मर्चंट हा आर्यन खान आणि सुहाना खान यांचा मित्र आहे. इन्स्टाग्रामवरही त्याची बऱ्यापैकी फॅन फॉलोइंग आहे. तो अनेकदा स्टार किडसच्या पार्ट्यांमध्ये दिसून आला आहे. अरबाझ मर्चंट हा मध्यंतरी पूजा बेदीची मुलगी अलाया एफ हिला डेट करत असल्याचीही चर्चा होती.

मुनमुन धमेचा कोण आहे?

मुनमुन धमेचा एक मॉडेल असून ती 39 वर्षांची आहे. मुनमुनला NCBने 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता अटक केली. मध्य प्रदेशची असणारी मुनमुन धमेचा एका उद्योगपती कुटुंबातून आहे. मुनमुन धमेचा एक मॉडेल असून ती सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे. मुनमुनच्या आईचे गेल्या वर्षी निधन झाले होते. तीचा भाऊ प्रिंन्स भमेचा सध्या दिल्लीमध्ये राहतो. मुनमुन धमेच्याने तिचे शालेय जीवन मध्य प्रदेशातील सागर येथे पूर्ण केले. त्यानंतर काही काळ ती तिच्या भावासोबत दिल्लीमध्ये राहत होती. धमेचा सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे. इंस्टाग्रामवर तीचे 10.3k फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर ती खूपच हॉट फोटो टाकत असते. धमेचा अनेक कलाकारांसोबत पार्टी करताना दिसून येत आहे. या संबधीचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहे. मुनमुन धमेचाने वरुण धवन, अर्जुन रामपाल, वीजे निखिल, गुरु रंधावा , सुयश राय यांसारख्या कलाकारांसोबत फोटो शेअर केले आहेत.

संबंधित बातम्या:

Aryan Khan Release From Jail | अखेर आर्यन खान 27 दिवसानंतर तुरुंगाबाहेर, ‘मन्नतवर दिवाळी’

Aryan Khan: आर्यनला चांगले दिवस येणार, ‘मन्नत’बाहेर आलेल्या साधू बाबाचे भाकीत

वीजबिलाच्या थकबाकीची ऊस बिलातून वसुली, साखर आयुक्तांनी आदेश मागं घ्यावा, अन्यथा संघर्ष अटळ, राजू शेट्टींचा इशारा

(munmun dhamecha and arbaaz merchant will walk out of jail today?)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.