AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“मी उद्या येतो आपण बोलू”, हरिभाऊ बागडेंचा फोन, राजू शिंदे म्हणाले “मी थांबलो तरी…”

भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांच्यासह काही नगरसेवक शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

मी उद्या येतो आपण बोलू, हरिभाऊ बागडेंचा फोन, राजू शिंदे म्हणाले मी थांबलो तरी...
राजू शिंदे हरिभाऊ बागडे
| Updated on: Jul 05, 2024 | 3:27 PM
Share

Raju Shinde Haribhau Bagde Conversation : सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला एकामागोमाग एक धक्के बसतच आहेत. त्यातच आता भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांच्यासह काही नगरसेवक शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. येत्या रविवारी होणाऱ्या शिवसंकल्प मेळाव्यात हे सर्व नेते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का बसणार आहे. त्यातच आता भाजपकडून राजू शिंदे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

हरिभाऊ बागडे काय म्हणाले?

राजू शिंदे यांना भाजप नेते हरिभाऊ बागडे यांनी फोन केला होता. या फोनवर त्यांनी राजू शिंदे यांची चौकशी केली. त्यावेळी त्यांनी कुठे आहे, अशी विचारपूस केली. त्यानंतर हरिभाऊ बागडे यांनी “मी उद्या येतो. आपण जरा भेटू. मला काही गोष्टी कानावर आल्या आहेत. मी आल्यावर त्यावर बोलतो”, असे आदेश फोनवरुन दिले.

राजू शिंदे काय म्हणाले?

त्यावर राजू शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. “भाऊ आता निर्णय झालाय आणि त्या गोष्टीला उशीरही झाला आहे. आता माझ्या सहनशक्तीचा अंत झाला आहे. भाऊ आम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतला आहे. मी जरी थांबलो तरी बाकीचे थांबणार नाहीत. इतक्या दिवसांपासून हे सर्व सुरु आहे, असे राजू शिंदे यांनी सांगितले. त्यावर हरिभाऊ बागडे यांनी मी येतोय. आपण आल्यावर यावर बोलू”, असे म्हटले.

राजू शिंदे आणि हरिभाऊ बागडे यांचा हा संवाद टीव्ही ९ मराठीच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यावेळी त्यांनी टीव्ही ९ मराठीशी संवादही साधला. त्यात त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात जाण्याचा त्यांचा निर्णय पक्का असल्याचे सांगितले. “हरिभाऊ बागडे, अतुल सावे, रावसाहेब दानवे यांचाही फोन आला होता. मला अनेकांचे फोन आले आहेत. पण आता या गोष्टीला उशीर झाला आहे. ही माझी एकट्याचीच नव्हे तर सर्वच कार्यकर्त्यांची भावना आहे”, असे राजू शिंदे यांनी सांगितले.

राजू शिंदेंसह 8 नगरसेवक करणार ठाकरे गटात प्रवेश

छत्रपती संभाजीनगरमधील माजी उपमहापौर राजू शिंदे यांच्यासह सह ते आठ नगरसेवक शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. भाजप सोडत असल्याच्या वृत्ताला राजू शिंदे यांनी दुजोरा दिला आहे. 5 ते 6 नगरसेवक सोबत घेऊन आम्ही भाजप सोडत आहोत. भाजप मध्ये राहून आपले प्रश्न सुटत नाहीत अशी भावना कार्यकर्त्यांची झाली आहे. त्यामुळे आम्ही भाजप सोडणार आहोत, असं शिंदे यांनी सांगितलं. ‘ मी महापौर, शहराध्यक्ष होऊ शकलो असतो पण झालो नाही याचा विचार भाजपने करावा. रविवारी शिवसंकल्प मेळाव्यात आमचा प्रवेश होणार आहे, इतर नगरसेवकांची नावे आम्ही आत्ताच सांगणार नाही कारण त्यांच्यावर दबाव येईल.’ असेही राजू शिंदे म्हणाले.

प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. येत्या रविवारी होणाऱ्या शिवसंकल्प मेळाव्यात हे भाजपचे हे शिलेदार शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मध्ये भाजपला मोठा धक्का बसणार आहे.

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.