AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…म्हणून युतीची सत्ता असताना शिवसेनेने उपमुख्यमंत्रीपद नाकारलं, पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंचा गंभीर आरोप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुन्ह एकदा शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे.  युती सरकारच्या काळात 2014 साली शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळणार होतं. मात्र शिवसेनेनं ते घेतलं नाही असा दावा त्यांनी केला आहे.

...म्हणून युतीची सत्ता असताना शिवसेनेने उपमुख्यमंत्रीपद नाकारलं, पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंचा गंभीर आरोप
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Sep 25, 2022 | 11:31 AM
Share

मुंबई :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) पुन्ह एकदा शिवसेना (Shiv Sena) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) गंभीर आरोप केला आहे.  युती सरकारच्या काळात 2014 साली शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळणार होतं. मात्र शिवसेनेने उपमुख्यमंत्रीपद घेतलं नाही. आपण जर उपमुख्यमंत्रीपद घेतलं तर मला उपमुख्यमंत्री करावे लागेल असं त्यांना वाटलं, त्यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्रीपद घेतलं नसावं असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की, हवं तर तुम्ही याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारा, तेच मला म्हटले होते तुम्हाला आता मोठी जबाबदारी सांभाळायची आहे. मात्र मला माहित होतं की शिवसेना उपमुख्यमंत्रीपद घेणार नाही. आपल्याला उपमुख्यमंत्रीपद मिळणार नाही, त्यामुळे मी तेव्हा कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही  मी गप्प बसलो असा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

काय म्हणाले शिंदे?

शिंदे, फडणवीस सरकारकडून कायमच शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे. शिंदे गटाच्या नेत्यांकडून अनेक गंभीर आरोप केले जात आहेत. आता आणखी असाच एक आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

2014 ला भाजप, शिवसेना युतीच्या काळात शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळालं असतं. मात्र शिवसेनेनेच ते घेण्यासाठी नकार दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ते एका कार्यक्रमामध्ये बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की,  त्यांना वाटलं असावं की उपमुख्यमंत्रीपद घेतल्यास मला उपमुख्यमंत्री करावे लागेल म्हणूनच शिवसेनेने उपमुख्यमंत्री पद घेतले नसावे असं मला वाटतं असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

केसरकरांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

दुसरीकडे शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंवर देखील टीका सुरूच आहे. शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी सत्ता गेल्यानेच त्यांच्यावर घरोघरी फिरण्याची वेळ आल्याचा घणाघात आदित्य ठाकरेंवर केला आहे.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....