‘..मग संजय राऊत राज्य सरकारवरही खटला भरणार आहेत का?’ चित्रा वाघ यांचा राऊतांना खोचक सवाल

ऑक्सिजन अभावी दगावलेल्यांच्या नातेवाईकांनी केंद्र सरकारवर खटलाच दाखल केला पाहिजे, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. राऊतांच्या या टीकेला भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. वाघ यांनी संजय राऊतांना त्यांच्याच भाषेत एक सवाल केलाय.

'..मग संजय राऊत राज्य सरकारवरही खटला भरणार आहेत का?' चित्रा वाघ यांचा राऊतांना खोचक सवाल
भाजप नेत्या चित्रा वाघ, शिवसेना खासदार संजय राऊत


मुंबई : ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावले नसल्याचं लेखी उत्तर केंद्र सरकारनं दिलं आहे. केंद्र सरकारच्या या उत्तरावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत चांगलेच संतापले आहेत. केंद्र सरकार सत्यापासून दूर पळत आहे. हे सरकार भ्रमिष्ट झालं असून ऑक्सिजन अभावी दगावलेल्यांच्या नातेवाईकांनी केंद्र सरकारवर खटलाच दाखल केला पाहिजे, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. राऊतांच्या या टीकेला भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. वाघ यांनी संजय राऊतांना त्यांच्याच भाषेत एक सवाल केलाय. (Chitra Wagh responds to Sanjay Raut’s criticism)

‘ऑक्सीजन अभावी एकही मृत्यू झाले नाहीत असं उत्तर दिल्याने केंद्रावर खटला भरावा असं संजय राऊत यांच म्हणणं आहे. मग, महाराष्ट्र सरकारने मे महीन्यात मा.उच्च न्यायालयात एकही मृत्यू ऑक्सीजन अभावी राज्यात झाला नाही अस प्रतिज्ञापत्र दिलयं. मग, राज्यसरकारवर ही राऊतजी खटला भरणार आहेत का ?’ असा सवाल चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलाय.

संजय राऊत काय म्हणाले?

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधत केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ऑक्सिजन अभावी रुग्णांचे मृत्यू झाले नाहीत, असं केंद्र सरकारने लेखी उत्तरात म्हटलं आहे. हे तुम्हाला पटतं का?, असा सवाल राऊत यांना केला. त्यावर राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. तुमचाही खरोखरच विश्वास बसतोय का हे आधी विचारलं पाहिजे. ज्यांचे नातेवाईक ऑक्सिजन अभावी मेले, जे मेडिकल सिलिंडरसाठी इकडे तिकडे हिंडत होते, त्यांचा विश्वास बसतोय का हे सांगायला हवं. सरकार खोटं बोलत आहे. ऑक्सिजन अभावी अनेक राज्यांमध्ये जे मृत झाले त्यांच्या नातेवाईकांनी सरकारवर खटला दाखल केला पाहिजे. उत्तर लेखी असेल किंवा मौखिक असेल पण सरकार सत्यापासून दूर पळत आहे. हा पेगाससचा परिणाम आहे. सरकार भ्रमिष्ट झालं आहे, असा घणाघाती हल्ला राऊत यांनी चढवला.

संबंधित बातम्या :  

प्रियांका चतुर्वेदी ते ओमराजे निंबाळकर, संजय राऊतांच्या दिल्लीतील घरी खासदार एकवटले, अधिवेशनात शिवसेना धमाका करणार?

आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Chitra Wagh responds to Sanjay Raut’s criticism

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI