AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीमध्ये अमित शाहा आणि फडणवीसांमध्ये बंद दाराआड खलबतं, नेमकी काय झाली चर्चा? मोठी बातमी समोर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बंददाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

दिल्लीमध्ये अमित शाहा आणि फडणवीसांमध्ये बंद दाराआड खलबतं, नेमकी काय झाली चर्चा? मोठी बातमी समोर
अमित शाहा, फडणवीस यांची बैठक Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 27, 2026 | 7:27 PM
Share

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बंददाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, अजूनही विधान परिषदेच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरूच आहे. या सर्व पार्शाभूमीवर ही चर्चा महत्त्वाची मानली जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्यामध्ये राज्यातील विविध राजकीय विषयांवर चर्चा झाली आहे. विधान परिषदेच्या जागा वाटपाचा महायुतीमधील तिढा अजूनही कायम आहे. याबाबत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची नेमकी मागणी काय आहे, यावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच महायुतीमधील अंतर्गत वादातील मुद्यांवर देखील यावेळी चर्चा झाली असल्याचं बोललं जात आहे.

विधान परिषदेच्या जागांसाठी रस्सीखेच 

राज्यात 17 विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. एक जून हा विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघ्या काही दिवसच आता शिल्लक राहिले आहेत, मात्र अजूनही महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा कायम आहे. अशा विधान परिषदेच्या काही जागा आहेत, जिथे शिवसेना आणि भाजप हे देन्ही पक्ष देखील आग्रही आहेत. त्यामुळे सध्या विधान परिषदेच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. यावरच या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

सरकारच्या शिष्टमंडळानं घेतली अमित शाहांची भेट 

दरम्यान दुसरीकडे राज्यात सध्या कांद्याचा प्रश्न तापला आहे. कांद्याला भाव मिळत नसल्यानं शेतकरी हातबल झाले आहेत. राज्यातील कांदा प्रश्नावर आज सरकारच्या शिष्टमंडळाने अमित शाहा यांची भेट घेतली आहे. या शिष्टमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह इतर मंत्र्यांचा देखील समावेश होता. चर्चा सकारात्मक झाल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Follow Us
केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
राष्ट्रवादीत मोठी खळबळ! केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे...
Supriya Sule | सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे जंतरमंतरवर
माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश
Ketan Agarwal Father | माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश; मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
Amit Thackeray | सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा
Hasan Mushrif | अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा; महायुतीतील चर्चांना नवं वळण
मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क...
Mumbai Sea | मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क राहण्याचे आवाहन
लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद!
Rohini Khadse | लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद! रोहिणी खडसेंनी सरकारला कोंडीत पकडलं
शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक
Shaina NC | शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक; अज्ञातांकडून पैशांची मागणी सुरू!
एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक
West Bangal | एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! रेल्वे क्रॉसिंगवर शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल....
Sushma Andhare | अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल यांच्या विश्वासार्हतेवर थेट सवाल!; सुषमा अंधारेंच्या एका विधानाने राजकारणात खळबळ!
ना मुनीर, ना पीएम, ना राष्ट्राध्यक्ष… पाकिस्तानात या व्यक्तीला सर्वाधिक वेतन.

ना मुनीर, ना पीएम, ना राष्ट्राध्यक्ष… पाकिस्तानात या व्यक्तीला सर्वाधिक वेतन

फडणवीस साहेब तुम्ही दहा दुसरे… पण गुंड सांभाळायचे बंद करा, मनोज जरांगे यांचे मुंडेंवर गंभीर आरोप.

फडणवीस साहेब तुम्ही दहा दुसरे… पण गुंड सांभाळायचे बंद करा, मनोज जरांगे यांचे मुंडेंवर गंभीर आरोप

मोठी बातमी! …तरच एनडीएमध्ये या भाजपची शरद पवार गटासमोर मोठी अट, राजकारणात घडामोडींना वेग.

मोठी बातमी! …तरच एनडीएमध्ये या भाजपची शरद पवार गटासमोर मोठी अट, राजकारणात घडामोडींना वेग

खासदार विशाल पाटील यांना मोठा धक्का, मिरज पंचायत समितीचे सभापतीपद रद्द, पुन्हा निवडणूक होणार.

खासदार विशाल पाटील यांना मोठा धक्का, मिरज पंचायत समितीचे सभापतीपद रद्द, पुन्हा निवडणूक होणार

Garry Sobers: जर्मनीच्या सैनिकांनी वडिलांना मारलं, लहानपणी कापली दोन बोटं! सोबर्स यांच्या 5 गोष्टी.

Garry Sobers: जर्मनीच्या सैनिकांनी वडिलांना मारलं, लहानपणी कापली दोन बोटं! सोबर्स यांच्या 5 गोष्टी

मेक्सिकोमध्ये 7.3 तीव्रतेचा भीषण भूकंप; नागरिक भयभीत; नव्या संकटाचा इशारा.

मेक्सिकोमध्ये 7.3 तीव्रतेचा भीषण भूकंप; नागरिक भयभीत; नव्या संकटाचा इशारा