राणे पुन्हा काँग्रेससोबत जाण्याची चर्चा, मुख्यमंत्री म्हणतात बुडत्या नावेत कोण जाईल?

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:15 PM, 25 May 2019
राणे पुन्हा काँग्रेससोबत जाण्याची चर्चा, मुख्यमंत्री म्हणतात बुडत्या नावेत कोण जाईल?

नवी दिल्ली : बुडत्या नावेत कोण जाईल, अशी मार्मिक टिपणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेंच्या काँग्रेससोबत जाण्याच्या चर्चेवर केली. मुख्यमंत्र्यांसह एनडीएचे दिग्गज नेते आज बैठकीसाठी दिल्लीत दाखल झाले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

भाजप पुरस्कृत राज्यसभेचे खासदार नारायण राणे हे पुन्हा काँग्रेससोबत जाण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत राणेंचे सुपुत्र निलेश राणे यांचा दारुण पराभव झाला. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विनायक राऊत यांनी पुन्हा बाजी मारली. या पराभवानंतर नारायण राणे पुन्हा काँग्रेससोबत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मात्र नारायण राणे यांच्या निकटवर्तीयांकडून अद्याप असे काहीही झाले नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं. नारायण राणे आज मुंबईतून भाजप खासदारांच्या बैठकीसाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. पण भविष्यातील वाटचाल (विधान सभा) ही महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष अशी असेल. राज्यात पक्ष स्वबळापेक्षा युतीत निवडणूक लढेल. युती भाजपबरोबर की काँग्रेसबरोबर आघाडीसोबत याचा निर्णय येत्या 10 ते 15 दिवसांत घेतला जाईल, असं राणेंच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आलं.

संबंधित बातम्या  

नारायण राणेंना उत्तर देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी मैदानात