CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सिद्धिविनायकाची आरती, मंदिर समिती अध्यक्ष आदेश बांदेकर शिवसेना भवनात! कारणही सांगितलं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सिद्धिविनायकाची आरती केली. त्यावेळी यांच्यासोबत काही आमदारही उपस्थित होते. मात्र, सिद्धिविनायक मंदिर समिती न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकर यावेळी मंदिरात अनुपस्थित होते.

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सिद्धिविनायकाची आरती, मंदिर समिती अध्यक्ष आदेश बांदेकर शिवसेना भवनात! कारणही सांगितलं
एकनाथ शिंदे यांच्याकडून सिद्धिविनायकाची आरतीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 05, 2022 | 4:41 PM

मुंबई : मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर सोमवारी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारनं विश्वासदर्शक ठरावही जिंकला. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी सोमवारी रात्री हुतात्मा स्मारक, चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शिवतीर्थावर जात बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना अभिवादन केलं. तसंच ठाण्यात आनंद दिघे यांच्या समाधीचंही दर्शन मुख्यमंत्र्यांनी घेतलं. तर मंगळवारी दुपारी शिंदे यांनी सिद्धिविनायक मंदिरात आरती केली. त्यावेळी शिंदे यांच्यासोबत काही आमदारही उपस्थित होते. मात्र, सिद्धिविनायक मंदिर समितीचे अध्यक्ष आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यावेळी मंदिरात अनुपस्थित होते. मुख्यमंत्री आरती करत असताना न्यासचे अध्यक्ष बांदेकर अनुपस्थित असल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिद्धिविनायक मंदिरात आरतीसाठी दाखल झाले होते. त्यावेळी न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकर शिवसेना भवनात बैठकीसाठी उपस्थित होते. त्यामुळे मुख्यमंत्री सिद्धिविनायकाची आरती करत असताना बांदेकर यांची मंदिरात अनुपस्थिती होती. याबाबत बांदेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धिविनायक मंदिर न्यासला मुख्यमंत्र्यांच्या आज होणाऱ्या सिद्धिविनायक दर्शनाबाबत कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती. ई मेलद्वारेही काही कळवण्यात आले नव्हते. पक्षाच्या पूर्वनियोजित बैठका होत्या. त्यामुळे आपण शिवसेना भवनात होतो. खरंतर काल संध्याकाळीच मुख्यमंत्री दर्शनाला येणार असं सांगण्यात आलं होतं, असंही बांदेकर यांनी सांगितलं.

‘गेले ते कावळे, राहिले ते मावळे’

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आता शिवसेनेला पुन्हा उभारी देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कामाला लागले आहेत. आज त्यांनी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. शिवसेना भवनमध्ये ही बैठक घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महिला पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलंच. शिवाय त्यांचं म्हणणंही ऐकून घेतलं. त्यांच्या मतदारसंघातील परिस्थितीही जाणून घेतली. यावेळी या महिला रणरागिणींनी शिवसेनेची पुनर्बांधणी करण्याचा निर्धार व्यक्त केला. गेले ते कावळे, राहिले ते मावळे असं सांगत आमच्या हातात शिवबंध आहे. आम्ही पुन्हा शिवसेना उभी करू, असं या रणरागिणी म्हणाल्या.

‘तुम्ही द्याल तो उमेदवार आम्ही निवडून आणू’

सातारा जिल्ह्यातील आमदार गेले. त्यांचं कधी काम नव्हतं. सहकार्य नव्हतं. ते कधी कार्यक्रमाला आम्हाला बोलवायचे नाही. त्यांच्या बॅनरवर आमचे कधी फोटो नव्हते. त्यांनी आमची पत्रं कुठे टाकली माहीत नाही. त्यामुळे ते गेले तरी आम्हाला फरक पडत नाही. तुम्ही हवा तो उमदेवार द्या. आम्ही निवडून आणून दाखवू, असं ही महिला म्हणाली.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.