AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भुजबळांच्या जिल्ह्यात मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंसह 5 मंत्री नाशिक दौऱ्यावर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आज 5 महत्वाचे मंत्री नाशिक दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray Nashik tour)आज नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्र आढवा बैठक घेणार आहेत.

भुजबळांच्या जिल्ह्यात मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंसह 5 मंत्री नाशिक दौऱ्यावर
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jan 30, 2020 | 10:35 AM
Share

नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आज 5 महत्वाचे मंत्री नाशिक दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray Nashik tour)आज नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्र आढवा बैठक घेणार आहेत. जळगाव, नंदुरबार, धुळे, अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यांचा आढवा बैठक घेण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्याचा स्वतंत्र बैठक घेऊन, सुरु असलेल्या प्रकल्पांचा आणि इतर कामकाजाची माहिती मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray Nashik tour) घेणार आहेत.

या आढवा बैठकीलाअन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री दादा भुसे आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा आढवा बैठक घेणार असल्याने या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

छगन भुजबळ हे नाशिकचे पालकमंत्री आहेत. तर दादा भुसे हे पालघरचे, हसन मुश्रीफ नगरचे, तर गुलाबराव पाटील जळगावचे पालकमंत्री आहेत. हे सर्व त्या त्या जिल्ह्यांच्या आढावा बैठकीला हजर असतील.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकाचवेळी 5 महत्त्वाच्या मंत्र्यांसह नाशिक दौऱ्यावर असल्याने, या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

मंत्रिमंडळ बैठक

दरम्यान, काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ठाकरे सरकारने महत्त्वाचे चार निर्णय घेतले.  यातील महत्त्वाचा निर्णय म्हणजे सरपंचांची निवड थेट लोकांमधून निवडणुकीद्वारे करण्याऐवजी आता पूर्वीप्रमाणेच निवडून आलेल्या सदस्यांमधून करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे सरपंच आणि सदस्य यांच्यामध्ये सुसंवाद वाढून ग्रामपंचायतींचे कामकाज अधिक सुलभ आणि गतिमान होईल, अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!