मुख्यमंत्र्यांनी माझा राजीनामा पत्रकार परिषदेत वाचून दाखवला, ती पहिलीच वेळ असावी : संजय राठोड

मुख्यमंत्र्यांना वाटेल तेव्हा ते मला परत मंत्रिमंडळात घेतील, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि माजी मंत्री संजय राठोड यांनी दिली. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

मुख्यमंत्र्यांनी माझा राजीनामा पत्रकार परिषदेत वाचून दाखवला, ती पहिलीच वेळ असावी : संजय राठोड
संजय राठोड आणि उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Sep 21, 2021 | 9:25 AM

नाशिक : मुख्यमंत्र्यांना वाटेल तेव्हा ते मला परत मंत्रिमंडळात घेतील, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि माजी मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी दिली. ते नाशिकमध्ये (Nashik) पत्रकार परिषदेत बोलत होते. संजय राठोड यांनी ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्यावतीने राज्यभर ‘ बंजारा ‘ समाज बांधवांशी संवाद आयोजित केला आहे.  एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणानंतर संजय राठोड यांच्यावर आरोप झाले होते, त्यावेळी त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.

याबाबत संजय राठोड म्हणाले, “माझ्यावर ज्यावेळी आरोप झाले त्यावेळी मी स्वतःहून राजीनामा दिला. माझा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन वाचून दाखवला. बहुदा एखाद्या मंत्र्याचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तो वाचून दाखवावा ही पहिली वेळ असावी, त्यामुळे माझ्यावर मुख्यमंत्र्यांचे असलेले प्रेम अधोरेखीत झाले”

मंत्रिपदासाठी दबाव नाही

मंत्रिपदाच्या दबावासाठी नव्हे तर ऑल इंडिया बंजारा सेवा संघ या समाज संघटनेच्या माध्यमातून राज्यभर ‘ बंजारा ‘ समाज बांधवांशी संवाद साधून, समाजाच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी हा दौरा सुरू असल्याचे माजी वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

राजकारण हा माझा व्यवसाय नाही, ज्या समाजातून मी आलोय त्या समाजाचा मी देणे लागतो. म्हणून माझे हे सामाजिक कार्य सुरु आहे, असं संजय राठोड यांनी नमूद केलं. मुख्यमंत्र्यांना वाटेल तेव्हा ते परत मंत्रिमंडळात घेतील, असं संजय राठोड म्हणाले.

संजय राठोड यांना दुसऱ्या प्रकरणात क्लीन चीट 

माजी मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांना शरीरसुखाची मागणी केल्याच्या आरोपां प्रकरणी क्लीन चिट देण्यात आली आहे. त्यानंतर ‘सत्य परेशान हो सकता है, पराजित नही…..’ असं सूचक ट्वीट संजय राठोड यांनी केलं होतं.  संजय राठोड यांच्याविरोधात एका महिलेने काही दिवसांपूर्वी यवतमाळ पोलिसांकडे पोस्टाने एक पत्र पाठवले होते. या तक्रार पत्रात संजय राठोड यांनी माझ्याकडे शरीरसुखाची मागणी केली आहे, असे आरोप करण्यात आले होते. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली होती.

संबंधित बातम्या 

तक्रार अर्ज खोटा, पतीचे नावही खोटे, शरीरसुखाची मागणी केल्याच्या आरोपामध्ये संजय राठोड यांना क्लीनचीट   

शरीरसुखाची मागणी केल्याच्या आरोपातून क्लीन चिट, संजय राठोड म्हणतात, ‘सत्य…’

‘राजीनामा देण्यास तयार, पण चौकशीनंतरच तो मंजूर करा’, राठोडांची मुख्यमंत्र्यांना विनंती?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.